फटाक्‍यांच्या पैशातून बालकाश्रमास वॉटर प्युरिफायर भेट

 water purification gift
water purification gift

सोलापूर - दिवाळीमध्ये फटाके न उडवता प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करून ३५ हजार ५१० रुपयांची बचत केली. या पैशातून नान्नज येथील बालकाश्रमास वॉटर प्युरिफायर भेट देण्यात आले. 

अभियांत्रिकीच्या प्रथम वर्षामध्ये शिकणाऱ्या ऋषिकेश पाटील, आकाश धायगुडे, गणेश ढगे, किरण वेदपाठक, अभिषेक गुमटे, अजय शहापुरे, नीलम गायकवाड, प्रज्ञा नाईकनवरे, अनुराधा शिंदे, स्नेहल पुजारी व इतर विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला. दिवाळीपूर्वी महाविद्यालयामध्ये जनजागृती केली व दिवाळीनंतर त्यांच्या प्रयत्नास यश आले व ३५ हजार ५१० रुपये जमा झाले. 

सलाम बालक ट्रस्ट ही राष्ट्रीय स्तरावर कार्यरत सामाजिक संस्था असून रस्त्यावर राहणाऱ्या मुलांचे संगोपन व शिक्षणासाठी काम करते. नान्नज येथे या संस्थेचे केंद्र आहे. या केंद्रामध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतचे १५० विद्यार्थी शिक्षण घेतात. 

वॉटर प्युरिफायरचे उद्‌घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. बी. दफेदार यांच्या हस्ते झाले. या वेळी सलाम बालक ट्रस्टचे झरीन गुप्ता, बिसलिंग वुड्‌स, दत्तात्रय विभूते, मिलिंद बिडवाई, किशोरअप्पा पाटील, डॉ. श्रीनिवास मेतन, प्रा. आय. आय. मुजावर, प्रा. एस. डी. जाधव उपस्थित होते.

क्षारयुक्त पाणी पिल्यामुळे मुले आजारी पडतात. हे टाळण्यासाठी आम्ही फटाक्यांच्या पैशातून वाटर प्युरिफायर खरेदी करण्याचा संकल्प केला.
ऋषिकेश पाटील, विद्यार्थी, प्रथम वर्ष

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com