जेऊरला कडाक्‍याच्या थंडीत ३०० विद्यार्थ्यांना मायेची ऊब

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 डिसेंबर 2018

वाल्हे - जेऊर, मांडकी, वीर, माहूर, पिसुर्टी आदी ठिकाणी शाळांमध्ये जाणाऱ्या ऊसतोडणी मजुरांची मुले व परिसरातील गरजू विद्यार्थ्यांना थंडीत घराबाहेर पडणे मुश्‍कील झाले आहे. अशा परिस्थितीची पर्वा न करता शिक्षणाचे धडे गिरवणाऱ्या ३०० विद्यार्थ्यांना जैन सोशल ग्रुप व सासवड येथील एकनाथकाका प्रतिष्ठानतर्फे स्वेटर वाटप केले. त्यामुळे माणुसकीच्या या उबदार स्पर्शामुळे मुलांच्या चेहऱ्यावर आनंद बहरला.

ऊस हंगामामध्ये ऊस तोडणीसाठी अनेक कुटुंबे पुरंदर तालुक्‍यामध्ये दाखल झाली आहेत. त्यांची शालाबाह्य मुले व काही गरजू मुलांची गरज ओळखून जैन सोशल ग्रुप व सासवड येथील एकनाथकाका प्रतिष्ठानने पुढाकार घेत तालुक्‍यातील ३०० विद्यार्थ्यांना स्वेटर वाटून सामाजिक बांधिलकी जपली. त्यांच्या उपक्रमाचे सर्व सर्वत्र कौतुक होत आहे. या वेळी जैन सोशल ग्रुपचे राजेश जैन, एकनाथकाका प्रतिष्ठानचे संतोष जगताप, सुनील जगताप, राजेंद्र चांदगुडे, चौरंगनाथ कामथे, रवींद्र पवार, यशवंत दगडे, कालिदास पवार, महेश साळुंके, सुरेश देशपांडे, सुधाकर सोनवणे, प्रशांत तांबे, राहुल शिंदे, सोनाली सरक आदी उपस्थित होते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cold Student Sweater Distribution Motivation Humanity