उपराजधानीच्या सौंदर्यासाठी सरसावली तरुणाई 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 नोव्हेंबर 2016

नागपूर - शहरात फेरफटका मारल्यास जागोजागी घाण आणि कचऱ्याचे ढीग नजरेस पडतात. काही जण त्याकडे दुर्लक्ष करतात तर काहींच्या नजरेस ती घाण खटकते. आपल्या शहराविषयी आस्था व प्रेम असलेल्या काही तरुणांनी गप्प न राहता उपराजधानीला स्वच्छ आणि सुंदर करण्याचा विडा उचललाय. "आय क्‍लीन नागपूर' ग्रुपच्या माध्यमातून शंभरावर तरुण-तरुणी दोन वर्षांपासून समाजेवा करताहेत. 

नागपूर - शहरात फेरफटका मारल्यास जागोजागी घाण आणि कचऱ्याचे ढीग नजरेस पडतात. काही जण त्याकडे दुर्लक्ष करतात तर काहींच्या नजरेस ती घाण खटकते. आपल्या शहराविषयी आस्था व प्रेम असलेल्या काही तरुणांनी गप्प न राहता उपराजधानीला स्वच्छ आणि सुंदर करण्याचा विडा उचललाय. "आय क्‍लीन नागपूर' ग्रुपच्या माध्यमातून शंभरावर तरुण-तरुणी दोन वर्षांपासून समाजेवा करताहेत. 

वंदना मुजूमदार या गृहिणीच्या पुढाकारातून "आय क्‍लीन नागपूर' उपक्रमास नोव्हेंबर 2014 मध्ये सुरुवात झाली. वंदना यांची बहीण कल्पना केकरे भोपाळला राहातात. तिथे "आय क्‍लीन भोपाल'च्या माध्यमातून भोपाळ शहर कचरामुक्‍त करण्याचा उपक्रम यशस्वीपणे राबविला जात आहे. नागपुरातही असाच प्रयोग केला जाऊ शकतो, असे त्यांना वाटले. हळूहळू यात एकेक जण जुळत गेला आणि एक मोठी फौज तयार झाली. आजघडीला शंभराच्या वर तरुण-तरुणी, गृहिणी, डॉक्‍टर्स, लेक्‍चरर्स, सीए ही शिकलेली मंडळी "आय क्‍लीन नागपूर'च्या माध्यमातून सेवा देताहेत. ही मंडळी प्रत्येक रविवारी सकाळी शहरातील एक ठिकाण निश्‍चित करून परिसर स्वच्छ करतात. केवळ साफसफाई नव्हे, तर तेथील भिंतींवर "वार्ली पेंटिंग' करून परिसर सुंदरही करतात. सुरवातीला तरुणांनी पॉकेटमनी खर्च केला. मात्र, त्यांचे काम पाहून आता शहरातील इतरही लोक पेन्टसाठी त्यांची मदत करीत आहेत. 

सोशल मीडियावर ऍक्‍टिव्ह 
"आय क्‍लीन नागपूर'च्या चमूने "फेसबुक पेज' तयार केले असून, ट्विवरही ते "ऍक्‍टिव्ह' आहेत. वॉट्‌स ऍप ग्रुपच्या माध्यमातून त्यांची "ऍक्‍टिव्हिटी' एकमेकांपर्यंत पोचविली जाते. क्षणार्धात सर्व सदस्य जिथे स्वच्छता करायची असते, त्या ठिकाणी पोहोचतात. 

स्वच्छ भारत अभियानास पाठिंबा 
"आय क्‍लीन नागपूर'चे सदस्य शाळांमध्ये तसेच आजूबाजूच्या खेड्यांमध्ये जाऊन स्वच्छतेचा संदेश देतात. त्यांच्या या उपक्रमामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वच्छ भारत अभियानासही मोठा हातभार लागत आहे. "आय क्‍लीन नागपूर' सोबत काम करताना आम्हाला समाधान मिळते असल्याचे वायसीसीईत अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या या विशीतील तरुणांनी सांगितले. 

आमच्या टीमने आतापर्यंत रेल्वेस्थानक, बस स्थानकासह शहरातील विविध ठिकाणी सेवा दिली. उपक्रमाची सुरवात आम्ही रामदासपेठेतील कल्पना बिल्डिंगमधून केली. परिसर स्वच्छ केल्यानंतर भिंती किंवा वॉल कम्पाऊंड "वार्ली आर्ट'ने रंगवितो. पीकेव्ही, स्टेट बॅंक ऑफ इंडिया, सिव्हिल लाइन्समधील रंगविलेल्या भिंती आमच्याच "आय क्‍लीन नागपूर'ने रंगविल्या आहेत. या कामात पालिकेच्या कर्मचाऱ्यांचीही मदत मिळते. 
अजिंक्‍य टोपरे, विवेक बन्सोड 

Web Title: The convention for the beauty of the capital of youthfulness