पाचगणीत कोरोना केअर सेंटरचा निर्धार, आमदार मकरंद पाटलांचा पुढाकार
वाढत्या कोरोना रुग्णांवर उपचारासाठी हॉस्पिटल अपुरी पडू लागल्याने आमदार मकरंद पाटील यांनी याबाबत पुढाकार घेतला असून पाचगणीसाठी आमदार पाटील हे ऑक्सिजन बेड व ऍब्युलन्स उपलब्ध करून देणार आहेत, असे मुख्याधिकारी दापकेकर यांनी सांगितले.
भिलार (जि. सातारा) : पाचगणी (ता. महाबळेश्वर) येथे 100 बेडचे कोविड केअर सेंटर लवकरच कार्यान्वित होणार असून त्यासाठी प्रशासनाने डॉन ऍकॅडमीची इमारत ताब्यात घेतली असल्याची माहिती तहसीलदार सुषमा पाटील यांनी दिली.
सध्या कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने त्यांच्या उपचारासाठी "बेल एअर'मधील व्यवस्था अपुरी ठरत असून वाढत्या रुग्णांचा विचार करता प्रशासन पातळीवर हा निर्णय घेण्यात आला. या इमारत व परिसराची पाहणी प्रांताधिकारी संगीता राजापूरकर-चौगुले, तहसीलदार सुषमा पाटील-चौधरी, नायब तहसीलदार दीपक सोनावणे, मुख्याधिकारी गिरीश दापकेकर, सहायक पोलिस निरीक्षक सतीश पवार यांनी डॉन ऍकॅडमी होस्टेलची पाहणी करून ती अधिग्रहित केली.
बोगस पदभरती प्रकरणात चौकशी समिती; तत्कालीन अधिकाऱ्यांकडे चौकशीचा तगादा
मुख्याधिकारी दापकेकर यांनी माहिती देताना सांगितले की, वाढत्या कोरोना रुग्णांवर उपचारासाठी हॉस्पिटल अपुरी पडू लागल्याने आमदार मकरंद पाटील यांनी याबाबत पुढाकार घेतला असून पाचगणीसाठी आमदार पाटील हे ऑक्सिजन बेड व ऍब्युलन्स उपलब्ध करून देणार आहेत. पाचगणी येथे सध्या रुग्णांची संख्या वाढत असून रुग्णांची गरज ओळखून हे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात येणार असून या ठिकाणी 100 बेड, तसेच 50 ऑक्सिजन बेड असणार आहेत. त्यामुळे या विभागातील कोरोना रुग्णांना दिलासा मिळणार आहे.
संपादन : बाळकृष्ण मधाळे