चूक सुधारणे हे चांगल्या माणसाचे लक्षण

गुरुवार, 4 ऑगस्ट 2016

चूक करणे हा मानवी गुणधर्म आहे आणि झालेली चूक सुधारणे हे चांगला माणूस असण्याचे द्योतक आहे. चूक प्रत्येकाकडून होते; पण ती स्वीकारण्याचा आणि कबूल करण्याचा मोठेपणा दाखवायला हवा. हे सर्वांनाच जमते असे नाही, अनेकजण चूक झाली हे समजत असूनही स्वीकारत नाहीत. तुम्हीही अशांपैकीच एक असाल तर आपली वागणूक सुधारा. 

‘चलता है’ हा तुमचा ॲटिट्यूड असेल, तर सावध व्हा. ऑफिसात दररोज उशिरा पोचणे योग्य नाही. एखाद्या दिवशी झालेला उशीर समजू शकतो; पण दररोज कारणांची भलीमोठी यादी देत असाल, तर वेळीच हा ॲटिट्यूड बदला. लेट लतिफचा शिक्‍का तुमच्या इमेजची पुरती वाट लावू शकतो. 

आक्रमक असणे, आपल्या हक्‍कांसाठी भांडणे, या गोष्टी ठीक आहेत; पण प्रत्येक गोष्टीत हमरीतुमरीवर येऊ नका. कलिगशी वाद घालताना संयम सोडू नका. आपले म्हणणे शांतपणे पटवून द्या. समोरच्याचे म्हणणे ऐकून घ्या. भांडखोर अशी इमेज करून घेऊ नका. तुमचा ॲग्रेसिव्हनेस कामात दाखवा. वागणुकीत फार आक्रमकता नको. 

कामाच्या बाबतीत कोणतीही कारणे देऊ नका. हे राहिले, ते राहिले, असे म्हणत रडत बसू नका. टाइम मॅनेजमेंटचे सूत्र पाळा. वेळेत काम पूर्ण करून बॉसला इंप्रेस करा. एखादे काम करायचे नसेल, तर तसे स्पष्ट सांगा; पण खोटा बहाणा करू नका. 

कामाच्या वेळी काम हे सूत्र जपा. सोशल साइटवर टीपी, फालतू गॉसिपिंगमुळे तुमच्या कामाचा महत्त्वाचा वेळ वाया जातो हे लक्षात घ्या. मोकळ्या वेळेत धमाल करा; पण काम करताना सगळे लक्ष त्याच्यावरच केंद्रित करा.

Web Title: Correction of mistakes

टॅग्स