कोविड योद्‌ध्यांच्या मदतीला 'देव' आला धावून!

कोविड योद्‌ध्यांच्या मदतीला 'देव' आला धावून!

कोपर्डे हवेली (जि. सातारा) : सध्याच्या कोरोना महामारीमध्ये विविध क्षेत्रातील कर्मचारी मोठ्या धाडसाने आपली जबाबदारी पार पाडत असल्याचा विचार करून विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियनचे सरचिटणीस आर. टी. देवकांत यांनी आपला वाढदिवस उत्साहात साजरा न करता वाढदिवसाच्या खर्चाच्या रकमेत कोविड योद्‌ध्यांचा विमा काढून समाजसेवेला एक नवी दिशा देण्याचा प्रयत्न केला आहे. 

तांत्रिक संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत तांत्रिक शक्ती संपादक व जिल्हा सचिव राम चव्हाण यांनी विमा काढण्यासंदर्भात संकल्पना मांडली. कसलेही विमा संरक्षण किंवा सवलती नसताना स्वतःचा जीव धोक्‍यात घालून आपल्या परिसरातील सर्व कुटुंबांचा सर्व्हे करणे, मुलांना पोषण आहार देऊन समाज व शासनाला मदत करणाऱ्या गरजू अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांचा तांत्रिक संघटनेकडून एक लाखांचे कोरोना कवच विमा व दोन लाखांचा एक वर्षाचा अपघात विमा काढण्यात आला. 

संघटनेने यापूर्वी 15 लाख रुपये कोरोना मदतनिधी शासनास दिला असून, संघटनेच्या सात हजार सभासदांकडून रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली आहे. दरम्यान, अंगणवाडी सेविका व मदतनिसांना श्री. देवकांत व केंद्रीय कोषाध्यक्ष संतोष घाडगे यांच्या हस्ते विमा प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. परिसरातील लहान मुलांना खाऊवाटप करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ सल्लागार माणिक बेळगुंपे, श्री. चव्हाण, हेमंत कुंभार, प्रमोद मोहिते, जितेंद्र पवार, अभिजित वाईकर, सारंग सुतार, गणेश पवार, राजेंद्र बजुगडे यांची उपस्थिती होती. श्री. देवकांत यांना पेढे, पुष्पगुच्छ व गुलाबाचे रोप भेट देऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com