वसुंधरेसाठी सायकलसफर

सागर शिंगटे
रविवार, 23 एप्रिल 2017

इंधन व वेळ वाचविण्यासाठी अभियंत्यांचा उपक्रम

पिंपरी - शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच इंधन आणि वेळ वाचविण्यासाठी तळवडे आयटी पार्कमधील सिंटेल कंपनीमधील गिरीराज उमरीकर आणि त्यांचे पाच सॉफ्टवेअर इंजिनिअर सहकारी दररोज घरापासून कंपनीपर्यंत आणि परत सायकलवरून घरापर्यंत नियमित प्रवास करत आहेत. त्यामुळे तळवडे चौकातील प्रदूषण, वाहतूक कोंडीमधूनदेखील त्यांची लवकर सुटका होत आहे.

इंधन व वेळ वाचविण्यासाठी अभियंत्यांचा उपक्रम

पिंपरी - शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच इंधन आणि वेळ वाचविण्यासाठी तळवडे आयटी पार्कमधील सिंटेल कंपनीमधील गिरीराज उमरीकर आणि त्यांचे पाच सॉफ्टवेअर इंजिनिअर सहकारी दररोज घरापासून कंपनीपर्यंत आणि परत सायकलवरून घरापर्यंत नियमित प्रवास करत आहेत. त्यामुळे तळवडे चौकातील प्रदूषण, वाहतूक कोंडीमधूनदेखील त्यांची लवकर सुटका होत आहे.

हिंजवडी आणि तळवडे आयटी पार्क येथे अनेक नामांकित आयटी कंपन्या आहेत. या कंपन्यांमध्ये हजारो कर्मचारी आहेत. बहुतेक कर्मचारी दैनंदिन प्रवास कंपनीच्या खासगी बसेस, स्वतःच्या दुचाकी अथवा चारचाकीमधून करतात; परंतु तळवडे आयटी पार्क येथील ‘सिंटेल’ कंपनीमधील गिरीराज उमरीकर आणि त्यांचे सहकारी विशाल बुट्टे, दीपक नाईक, दिग्विजय खामकर, कौस्तुभ रामदासी, रोहित संचेती यांनी त्याला फाटा देत नियमितपणे सायकलवरून प्रवास करत आहेत. ३५ वर्षीय उमरीकर हे ‘सिंटेल’मध्ये ‘सिनिअर प्रोजेक्‍ट लिडर’ म्हणून काम करतात. त्यांच्यासह त्यांचे इतर सहकारी हे सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत. 

उमरीकर म्हणाले, ‘‘चिखली प्राधिकरण येथील स्पाइन रोडवरील पेठ क्र.१६ येथे मी राहतो. तळवडे-चाकण पूल झाल्यापासून तळवडे चौकात नेहमी वाहतुकीची कोंडी होते. मोठी अवजड वाहने, खासगी बसगाड्यांमुळे कोंडीत आणखी भर पडते. सुरवातीला शारीरिक तंदुरुस्ती टिकवून ठेवण्यासाठी आम्ही सायकलिंग करत होतो; परंतु पुढे प्रायोगिक तत्त्वावर १ ते २ आठवडे घरापासून कंपनी आणि परत घरापर्यंतचा दैनंदिन प्रवास सायकलवरून करण्याचा निर्णय घेतला. सायकलवरून प्रवास करताना अधिक सुलभ वाटले. त्यामुळे आम्ही नियमितपणे सायकलवरून ये-जा करत आहोत. माझ्या घरापासून कंपनीपर्यंतचे अंतर हे १८ ते २० किलोमीटर इतके आहे. हे अंतर पूर्ण करण्यासाठी मला २० ते २१ मिनिटे लागतात.’’ 

‘सिंटेल’ सायकलिस्ट क्‍लबची स्थापना
‘इंडो सायकलिस्ट क्‍लब’ (आयसीसी) पासून प्रेरणा घेऊन उमरीकर यांनी सिंटेल कंपनीत ‘सिंटेल सायकलिस्ट क्‍लब’ स्थापन केला आहे. त्या क्‍लबला त्यांचे इतर सहकारीही जोडले गेले आहेत. आठवड्यामधून किमान ५ दिवस तरी त्यांचा सायकलवरून प्रवास करण्याचा प्रयत्न असतो. ‘आयसीसी’चे गजानन खैरे, अजित पाटील यांचे त्यांना मोलाचे सहकार्य लाभले.

केवळ शारीरिक तंदुरुस्ती टिकविण्यासाठी सायकलिंग सुरू केले; परंतु आता घर ते ऑफिसपर्यंतच्या सायकल प्रवासाने मला अधिक ऊर्जा मिळत आहे. मधुमेह, उच्च रक्तदाब यासारख्या विकारांवरही नियंत्रण मिळविणे त्यामुळे शक्‍य होत आहे.
- गिरिराज उमरीकर, सायकलपटू  

Web Title: cycle traveling for vasundhara