यात्रेला गेले आणि बंधारा बांधून आले!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 मे 2017

जीवन मित्र फाउंडेशनचा अनोखा उपक्रम; कोलेवाडीत बंधाऱ्याची निर्मिती

हुमगाव - जावळी तालुक्‍यातील यात्रांची सांगता होत असताना शेवटी हुमगावपाठोपाठ कोलेवाडीचे गामदैवत पिंपळेश्वर-वाघजाई देवीची यात्रा असते. ग्रामीण भागात मित्र मंडळी आणि पाहुण्यांना जेवणावळीचे आमंत्रण देण्याची पद्धत आहे. अशाच एका कोलेवाडीतील कुटुंबाकडून जेवणाचे निमंत्रण आले असता जेवायला येतो; पण आम्ही गावासाठी काही तरी श्रमदान करणार अशी अट ‘टीम’च्या वतीने जीवन मित्र फाउंडेशनचे अध्यक्ष सोमनाथ काशिळकर यांनी घातली व त्यांच्या मित्राच्या कुटुंबाने मान्य केली.    

यात्रेच्या दुसऱ्या दिवशीचा मुहूर्त निघाला. त्यानुसार कोलेवाडीच्या डोंगर उतारावरील ऐतिहासिक चिंचखिंड भागातील रांजणझरा ही जागा निवडण्यात आली. त्याप्रमाणे काशिळकर हे आपल्या ‘टीम’सह पहाटे सोडपाच वाजता हजर झाले. स्वयंस्फूर्तीने गावातील तरुण आणि काही वडिलधारी, ग्रामस्थ मंडळीही टिकाव, फावडी, घमेली घेऊन हजर होती. गावापासून उत्तरेच्या दिशेने जाऊन गाड्यांनी डोंगरपायथा गाठला आणि बंधाऱ्याच्या कामाला सुरवात झाली ती पण विनानारळ फोडताच! कारण उन्हाच्या आत काम उरकणे गरजेचे होते आणि मान्यवर एवढ्या पहाटे उपस्थित राहणे शक्‍य नव्हते. तासाभरात काम करणारे हात वाढत गेले. २० ते २५ लोकांची ‘टीम’ तयार झाली. फाउंडेशनच्या काशिळकर, दत्ता पवार, संजय पवार, किरण बोराटे, दत्ता पवार, प्रमोद मोरे, सुहास पाटील, प्रमोद कुलकर्णी, संदीप माने, संदीप शहा, वेंदे, संजय बोराटे, रामदास पाडळे, नामदेव करंजेकर, सदाशिव भिसे या ‘टीम’ने गावातील तरुण श्रीनिवास इंगुळकर, अजय राजणे, सुनील पवार, संदीप इंगुळकर, सुधीर गाढवे, रावसाहेब रांजणे, सुनील भालेघरे, उपसरपंच रामदास रांजणे, उत्तम रांजणे, तुकाराम गाढवे यांनी दुपारपर्यंत बंधाऱ्याची निर्मिती केली. बंधारा पूर्ण झाल्यानंतर सर्वांच्या चेहऱ्यावर कष्ट केल्याचे समाधान दिसत होते.

‘‘भविष्यात तुमच्या गावामध्ये किती झाडे आणि पाण्याचा साठा उपलब्ध आहे, यावरून त्या गावाची श्रीमंती ठरेल.’’ 

- सोमनाथ काशिळकर 

Web Title: dam built by jeevan mitra foundation