मुलगी जन्मल्यास पित्याला सहा महिने मोफत सेवा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 8 जानेवारी 2017

कुंबेफळ येथे हेअर सलून व्यावसायिकाने केला संकल्प

केज - जिल्ह्याच्या लिंग गुणोत्तरातील असमतोल दूर करण्यासाठी शासकीय पातळीवरून विविध उपक्रम राबवले जात आहेत. नागरिकदेखील या प्रश्‍नाबाबत जनजागृती करण्यासाठी पुढे येत आहेत. मुलगी जन्मल्यास मुलीच्या पित्याला सहा महिने मोफत सेवा देण्याचा संकल्प कुंबेफळ (ता. केज) येथील एका हेअर सलून व्यावसायिकाने केला आहे.

जिल्ह्यात लिंग गुणोत्तरातील वाढती तफावत सामाजिकदृष्ट्या चिंतेची बाब समजली जाते. हा असमतोल दूर करण्यासाठी सरकारने कायदेशीर मार्गासह जनजागृतीच्या माध्यमातून प्रयत्न सुरू केले आहेत. सरकारी प्रयत्नांना समाजातील काही संवेदनशील नागरिकही आपापल्या कुवतीप्रमाणे हातभार लावत आहेत. त्याचे सकारात्मक परिणामही दिसून येत आहेत. तसे पाहिल्यास आजही मुलगी जन्मली तर नाक मुरडणारे कमी नाहीत. ‘वंशाचा दिवा’ या मानसिकतेतून नागरिक बाहेर पडत नसल्याने मुलींचा जन्मच नाकारला जातोय. अशा परिस्थितीत मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी कुंबेफळ येथील सलून व्यावसायिक पुढे सरसावले आहेत. 

अशोक पवार यांचे कुंबेफळ येथे ईश्वरी जेन्टस पार्लर नावाचे हेअर सलूनचे दुकान आहे. या तरुणाने नववर्षाच्या सुरवातीला दुकानावर ‘स्वागत लेकीचे’ असा फलक लावून एक अनोखा उपक्रम सुरू केला आहे. गावात मुलगी जन्मल्यास त्या मुलीचे मोफत जावळ काढायचे, शिवाय मुलीच्या पित्याची सहा महिन्यांपर्यंत मोफत दाढी, कटिंग करण्याचा संकल्प केला आहे. 

अनेक ठिकाणी मुलगी जन्मल्यास कुटुंबीयांचा उत्साह मावळतो. केवळ वैचारिक परिपक्वतेअभावी असे घडते. माझ्या छोट्या मुलीमुळे ही प्रेरणा मिळाली. नवीन वर्षात सुरू केलेल्या संकल्पानुसार गावातील एका मुलीच्या पित्याला मोफत सेवा सुरू केली. शक्‍य झाल्यास जनजागृतीसाठी हा उपक्रम तालुकाभर राबवणार आहे.
- अशोक पवार, ईश्वरी जेन्टस्‌ पार्लर, कुंबेफळ  

Web Title: Daughter, born six months of free service to the Father