#saturdaymotivation : जिद्दीने फुलवली डाळिंब, मोसंबीची शेती

pomogranate
pomogranate

गंगापूर, ता. 30 (जि.औरंगाबाद) : वरखेड (ता. गंगापूर) येथील अल्पभूधारक शेतकरी दिलीप मधुकर वाघ यांनी अपंगत्वावर मात करत शेतात जिद्दीने डाळिंब, मोसंबीची बाग फुलवली आहे. दुष्काळात त्यांना नांदूर-मधमेश्वर कालव्याच्या पाण्याचा आधार मिळाला आहे. अनेक शेतकरी दूरवरून शेती पाहण्यासाठी येतात.

कठीण परिश्रमांतून त्यांनी हे यश मिळवले आहे. सव्वा एकर शेतात पाचशे डाळिंब, तर दीड एकरात 320 झाडे आहेत. सध्या डाळिंबाला भाव चांगला असल्याने दहा ते बारा लाखांचे उत्पन्न होणार असल्याचे त्यांनी सांगितले. अपंग असूनही शेतातील सर्वच कामे ते चोखपणे वेळेत करतात. पिकांबाबतीत योग्य व्यवस्थापन करून ते चांगले उत्पादन कसे घेता येईल, याकडे कटाक्षाने लक्ष देतात.

शेतीबरोबरच ते गावातील राजकारणातही सक्रिय असून, 2006 ते 11 या कालावधीत त्यांनी गावातील उपसरपंचपदही भूषविले आहे. त्यांच्या या जिद्दीला त्यांचे सर्व कुटुंब शेतात सहकार्य करते. तसेच कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनीही त्यांची जिद्दी कहाणी ऐकून शेतावर भेटी देत त्यांना वेळोवेळी मार्गदर्शनही केले आहे. वयाच्या 21 व्या वर्षी आलेले अपंगत्व हसतमुखाने स्वीकारून सतत काम करत राहणे, हा त्यांचा मूलमंत्र आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com