जिद्दीच्या जोरावर ४६ व्या वर्षी ४२ किलोमीटरची मॅरेथॉन पूर्ण

जिद्दीच्या जोरावर ४६ व्या वर्षी ४२ किलोमीटरची मॅरेथॉन पूर्ण

पाटोदा - प्रबळ इच्छाशक्ती व जिद्द असेल तर अशक्‍य काहीच नसते. पाटोदा तालुक्‍यातील सौताडा येथील डॉ. पांडुरंग सानप यांनी वयाच्या ४६ व्या वर्षी थेट मुंबई येथे पार पडलेली तब्बल ४२ किलोमीटरच्या मॅरेथॉन स्पर्धेत भाग घेऊन यशही मिळविले आहे.

सौताडा येथील रहिवासी डॉ. सानप हे वैद्यकीय व्यवसायानिमित्त जवळच असलेल्या जामखेड येथे राहतात. काही वर्षांपूर्वी त्यांनी व्यायामाच्या आवडीतून धावण्याचा सराव सुरू केला. सुरवातीला केवळ व्यायामाच्या उद्देशातून सुरू केलेल्या धावण्याच्या सरावाला हळूहळू वाढवत त्यांनी थेट १० किलोमीटरपर्यंत नेले. त्यानंतर आत्मविश्वास वाढल्याने त्यांनी थेट मॅरेथॉनमध्ये सहभाग घेण्यास सुरवात केली व अनेक मॅरेथॉन पूर्ण केल्या.डॉ. सानप यांनी आतापर्यंत अनेक मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग नोंदवत त्या यशस्वी पूर्ण केल्या. औरंगाबाद, नगर, सातारा येथील २१ किलोमीटरच्या हाफ मॅरेथॉन, तर शिर्डी येथील तब्बल ४२ किलोमीटरची पूर्ण मॅरेथॉनही त्यांनी यशस्वी पूर्ण केली. लडाख येथे ११ हजार फूट उंचीवर ऑक्‍सिजनची कमी असतानाही २१ किमीची मॅरेथॉन न थांबता त्यांनी पूर्ण केली होती. आता मुंबईत रविवारी झालेल्या मॅरेथॉनमध्ये भाग घेऊन ४२ किमीची मॅरेथॉन यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com