esakal | पुण्याच्या आपत्ती निवारण ट्रस्टचा म्हसवडच्या आरोग्य केंद्राला मदतीचा हात
sakal

बोलून बातमी शोधा

Dr. Patangrao Kadam Trust

पुण्याच्या आपत्ती निवारण ट्रस्टचा म्हसवडच्या आरोग्य केंद्राला मदतीचा हात

sakal_logo
By
सल्लाउद्दीन चोपदार

म्हसवड (सातारा) : आम्ही म्हसवडकर ग्रुपने लोकसहभागातून सुरू केलेल्या येथील कोविड केअर सेंटरसाठी पुण्यातील भारती विद्यापीठातील "डॉ. पतंगराव कदम (Dr. Patangrao Kadam) आपत्ती निवारण ट्रस्ट'मधून सहा लाख 66 हजार रुपये किमतीच्या वैद्यकीय साधनांची मदत भारती हॉस्पिटलच्या कार्यकारी संचालक डॉ. अस्मिताताई जगताप यांच्या हस्ते येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात देण्यात आली. (Dr. Patangrao Kadam Trust Donates 6 Lakh To Mhaswad Hospital)

या वेळी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, उपाध्यक्ष एम. के. भोसले, नगराध्यक्ष भगतसिंग वीरकर, कोविड सेंटरचे डॉ. रोहन मोडासे, डॉ. राजेंद्र मोडासे, युवराज सूर्यवंशी, कैलास भोरे, माजी नगराध्यक्ष विजय धट, सुरेश म्हेत्रे, डॉ. वसंत मासाळ, लक्ष्मण सरतापे, नगरसेवक अकील काझी, विकास गोंजारी, अनिल लोखंडे उपस्थित होते. यावेळी डॉ. जगताप म्हणाल्या, "मंत्री विश्वजित कदम यांनी गेल्या वर्षी म्हसवड भेटीत दिलेल्या आश्वासनांची पूर्ती म्हणून येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कोरोना निवारणासाठी मदत दिलेली आहे.''

आता खाेट बाेललात तर तुमच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल हाेणार

येथील सिध्दनाथ मंदिर देवस्थान कदम कुटुंबाचे कुलदैवत आहे. (कै.) पतंगराव कदम यांच्याबरोबर आम्ही कुटुंबिय दरवर्षी म्हसवडला जायचो. त्या वेळी मंदिर व परिसरासाठी विकासकामांबाबत ग्रामस्थांच्या सूचनांची तातडीने दखल घेत साहेब विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून देत होते. ही परंपरा कदम कुटुंबीयांनी कायम राखली आहे.

-विश्वजित कदम, मंत्री

साताऱ्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

Dr. Patangrao Kadam Trust Donates 6 Lakh To Mhaswad Hospital

loading image
go to top