मिरवणूक खर्च टाळून जनावरांसाठी चारा

मिरवणूक खर्च टाळून जनावरांसाठी चारा

पुणे - महाराणा प्रताप यांच्या ४७९व्या जयंतीनिमित्त मिरवणुकीचा खर्च टाळून समस्त राजपूत समाज अंकित राजपूत सोशल वॉरिअर्स संघटनेने दुष्काळग्रस्त भागातील जनावरांच्या छावण्यांना चारा वाटप केले. दौंड व शिरूर तालुक्‍यातील या दुष्काळी भागातील जनावरांना हा चारा देण्यात आला आहे. 

महाराणा प्रताप जयंतीनिमित्त हिंदू राजपूत समाजाच्या राजपूत महिला युवक मंडळातर्फे गणेश पेठेपासून महाराणा प्रताप उद्यानापर्यंत दुचाकींची रॅली काढण्यात आली. या रॅलीत महिला व युवती मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. जनावरांच्या छावण्यांना चारा देण्याच्या उपक्रमाचा शुभारंभ महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते थोरले बाजीराव रस्त्यावरील महाराणा प्रताप उद्यान येथे करण्यात आला. ॲड. प्रताप परदेशी, संघटनेचे संस्थापक अध्यक्ष किशोर रजपूत, शैलेश बढाई, गोपी पवार, राजेंद्र परदेशी, सुरेंद्र काची, मनीष साळुंके, सुनील परदेशी, सुरेश ठाकूर, रतन किराड, शेखर हराडे, सोमनाथ परदेशी, गोपीनाथ परदेशी आदी उपस्थित होते.  

टिळक म्हणाल्या, ‘‘दूधभट्टीच्या ठिकाणी महाराणा प्रताप यांचा अश्वारूढ पुतळा उभारला जाईल. महाराणा प्रताप उद्यानाचीदेखील पुनर्रचना करण्यात येणार आहे.’’ किशोर रजपूत म्हणाले, ‘‘राजपूत समाज विविध ठिकाणी विखुरलेला आहे. या समाजाने एकत्र आले पाहिजे. सामाजिक एकता म्हणजेच राष्ट्राची एकता आहे. समाजाकडून विविध कार्यक्रम व उपक्रम पुढील काळात राबविले जातील.’’ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com