तरुणांनी बांधले ६० गॅब्रियन टाइपचे बंधारे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 मे 2017

ओंडमधील शेती व पिण्याच्या पाण्याचा सुटणार प्रश्न; ग्रामस्थांचे आर्थिक सहकार्य

काले - ओंड येथे लोकसहभागातून व तरुणाईच्या श्रमदानातून गॅब्रियन टाइपचे साठहून अधिक बंधारे बांधले आहेत. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात बंधाऱ्यात समाधानकारक पाणीसाठा होणार आहे.

ओंड येथे शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न नेहमीचाच बनला आहे.

त्यासाठी ठोस उपायांची गरज आहे. मात्र, पाण्याचे परिसरातील स्त्रोत पूर्ण कोरडे पडल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होतो. त्यावर काही अंशी उपाय म्हणून शासनाच्या ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या जलसंधारणाच्या उपक्रमाला प्रतिसाद देत गावातील ओढ्यावर डोंगरावरच्या उतारावर गॅब्रियन टाइपचे सुमारे ६० हून अधिक बंधारे बांधले आहेत. यासाठी ग्याल्वनाईज सळीच्या जाळ्यांचा वापर केला आहे. काही बंधाऱ्यांची लांबी सात ते दहा मीटर, रुंदी तीन मीटर व उंची दीड ते दोन मीटर ठेवली आहे. बंधाऱ्यासाठी दगड व मातीचाही काही ठिकाणी वापर केला आहे. कोणत्याही यांत्रिक साहित्याचा वापर न करता श्रमदानातून हे बंधारे बांधले आहेत. गावविहिरीच्या हनुमान मंदिराजवळ असलेल्या ठिकाणीही बंधारा बांधला असून विहिरीच्या पाणीपातळीत वाढ होण्यास मदत होणार आहे. या बंधाऱ्यात सुमारे एक लाख लिटर पाणीसाठा होईल, असा अंदाज आहे.

तरुणांच्या श्रमदानातून या सर्व बंधाऱ्यांची कामे पूर्ण केली आहेत. बंधारे बांधण्यासाठी सळी व इतर खर्चासाठी ग्रामस्थांना आर्थिक सहकार्य केले आहे. असा प्रायोगिक तत्त्वावर पहिलाच प्रयोग केला असून, त्यात तरुणांना यश आले आहे. यंदाच्या पावसाळ्यात या बंधाऱ्यातून पाणीसाठा होऊन परिसरातील पाणी स्त्रोतांच्या भूजल पातळीत वाढ होणार आहे. त्यामुळे शेतकरी, ग्रामस्थ समाधान व्यक्त करत आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: gabrian type dam