अपंग शेतकऱ्याची हायटेक शेती

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 नोव्हेंबर 2016

खरिपातील तूर फुलवली ओढ्याच्या पाण्यावर

लाेहा - तालुक्यातील हिप्परगा (चितळी) येथील अपंग अल्पभूधारक शेतकरी माधव अन्नकाडे यांच्या जिद्दीला सलाम. सततचा दुष्काळ, कधी गारपीठ, तर कधी माेठा पाऊस... ताेट्यातल्या शेतीसाठी सिंचनाची व्यवस्था नाही...

पावसाच्या पाण्यावर परिसरातील ओढा आडवला. मातीबंध घातला... सिमेंटच्या गाेण्या टाकल्या आणि खरिपातील सुधारित तूर पिकाला जमेल तेवढे पाणी देऊन तूर फुलवली. 

खरीप हंगामात द्विपीक पद्धतीचे माधव अन्नकाडे यांनी नियाेजन केले. साेयाबीन पिकात आंतरपीक तूर घेतली. तूर, साेयाबीन पिकाला नायट्राेजन मात्रा भरपूर मिळाली. हंगामात साेयाबीन कापणीनंतर वखरपाळी देऊन तण नाहिसे केले. कीटकनाशकाची धुराळणीही केली. पहिल्याच प्रयत्नात तीन एक्कर पिकाला माेठा बहार आला. साेयाबीन पिकात सहा फूट अंतरावर तुरीच्या पूर्व - पश्‍चिम दिशा ठरवून तुरीची लागवड केली. आेल्या शिंदीच्या पागाोऱ्याने तुरीचे शेंड झाटणी केली. या प्रकाराने तुरीच्या झाडाला विस्तारित फांद्या निघाल्या. अपेक्षित वेळात खताची मात्रा व कीडनाशकाची धुराळणी केल्याने तूर पीक डवरलेली असल्याचे ते माेठ्या अभिमानाने सांगतात. पीक संवर्धनात चर्चा व्हावी, जमिनीची उत्पादन क्षमता टिकवून ठेवण्यासाठी पारंपरिक पीक पद्धतीवर अवलंबून न राहता पिकांशी संबंधित तंत्रज्ञानाची माहिती आवश्‍यक असल्याचे अपंग शेतकरी माधव अन्नकाडे सांगतात.

Web Title: High-Tech Agriculture by handicaped farmer