मुलांच्या शिक्षणासाठी विकले घरदार अन्‌ सोने 

रामकृष्ण लांबतुरे : सकाळ वृत्तसेवा 
मंगळवार, 10 जानेवारी 2017

विड्या वळून मुलांना बनविले प्राचार्य, बॅंक अधिकारी 

सोलापूर- विड्या वळता-वळता मिळणाऱ्या वेतनातच हातातोंडचा घास जवळ करण्यासाठी रोजची धावपळ. यात दोन मुलांचे शिक्षण, पुढे उच्चशिक्षण कसे करायचे हा आ वासून पडलेला प्रश्‍न. अशा वेळी आपल्या मुलांना चांगले शिक्षण देऊन मोठ्या पदांवर पोचवायचे, या एकाच उद्देशाने प्रेरित झालेल्या माउलीने राहते घर आणि अंगावरचे सोने विकण्यासही मागेपुढे पाहिले नाही. त्यांच्या कष्टाचे आज चीज झाले असून त्यांची दोन्ही मुले प्राध्यापक आणि बॅंक अधिकारी, अशी उच्च पदस्थ आहेत. 

शशिकला दशरथ साखरे या पूर्वभागात राहणाऱ्या महिलेची ही यशकथा आहे. त्यांचा मोठा मुलगा रत्नाकर हा एका महाविद्यालयात विज्ञान विभागाचा विभागप्रमुख प्राचार्य आहे. तर दुसरा महेश हा एका खासगी बॅंकेत मोठा क्षेत्रीय अधिकारी आहे. 

शशिकला यांनी रात्रंदिवस विड्या वळून मुलांचे शिक्षण पूर्ण केले. मुलांनाही आपल्या गरिबीची जाणीव करून त्यांनाही काम करून शिकण्यास प्रवृत्त केले. श्रमाची आवड लहान वयातच लावली. असेच एकदा अडचणीच्या काळात रत्नाकर यांची तीन हजारांची शैक्षणिक फी भरणे कठीण झाले होते, याच काळात निरामय आरोग्यधामच्या संस्थापिका डॉ. सीमा किणीकर यांनी मदतीचा हात पुढे केला. शिवणकलेत पारंगत असलेल्या शशिकला यांच्याकडे मशिन घेण्यासाठी पैसे नव्हते. या कठीण काळात दीर प्रकाश यांच्याकडून आर्थिक मदत मिळाली. 

सुनेमध्ये मुलीचे प्रेम 
आजच्या युगात एकट्याच्या कमाईवर संसाराचा गाडा चालत नाही. हे जाणून त्यांनी सून नीता यांना एका खासगी ठिकाणी हिशेबनीस म्हणून काम करण्यासाठी प्रोत्साहित केले. स्वत:ला मुलगी नसली तरी आज त्या सुनेला मुलीच्या रूपात पाहत आहेत. 

Web Title: House and gold sold for the education of children