वस्तीतील गरजूंसाठी ‘हाउस ऑफ स्माइल्स’

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 फेब्रुवारी 2017

पुणे - वस्तीतील गरजू लोकांचे प्रश्‍न जाणून त्यांना मदतीचा हात देण्याचा विडा ‘स्वाधार’ या स्वयंसेवी संस्थेने उचलला आहे. त्यासाठीच संस्थेने इटलीतील ब्रेम्बो ब्रेक इंडिया कंपनीच्या मदतीने ‘हाउस ऑफ स्माइल्स’ हा प्रकल्प हाती घेतला आहे. त्याअंतर्गत बिबवेवाडी येथील वस्तीतील गरजू कुटुंबांना मदतीचा हात देऊन त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्याचा निर्धार संस्थेने केला असून, एक कोटी ६० लाख रुपयांच्या निधीतून प्रत्येकाचे प्रश्‍न सोडविण्याचा प्रयत्न होणार आहे.  

 प्रकल्पाचे उद्‌घाटन कंपनीच्या सामाजिक उत्तरदायित्व निधी विभागाच्या अधिकारी क्रिस्तीना बोंबासी यांच्या हस्ते झाले. कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक लुक्का बोटेझी, पॅट्रिझिया गटटोनी, सेस्वी पाओलो फेरारी, ॲडिया मॅरेस्कॉटी, स्वाधारच्या अध्यक्षा सरिता भट आणि सचिव संजीवनी हिंगणे आदी उपस्थित होते. बोंबासी यांनी राजीव गांधीनगर केंद्राला भेट देऊन मुलांशी आणि कर्मचाऱ्यांशी संवाद साधला.

स्वाधार संस्थेकडून बिबवेवाडीतील राजीव गांधी नगर, पापळवस्ती आणि अप्पर लोटा या तीन वस्त्यांमध्ये हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. त्याअंतर्गत वस्त्यांमधील घरांचे आणि कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात येणार असून, कुटुंबांतील गरजा विचारात घेऊन त्यांना मदत करण्यात येणार आहे. 

स्वाधारचे रवींद्र देशपांडे म्हणाले, ‘‘वस्त्यांमधील कुटुंबाच्या गरजा लक्षात घेऊन त्यांना मदत दिली जाणार आहे. यामध्ये वस्ती वाचनालय, अभ्यासिका, बालवाडी, किशोरवयीन मुली व महिलांसाठी व्यवसाय शिक्षण केंद्र, जाणीव जागृती कार्यक्रम आणि कौटुंबिक समुपदेशन केंद्र उभारण्यात येणार आहे. हा प्रकल्प दोन वर्षांसाठी असणार आहे.’’

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: house of smiles