थंडीत बॉडी केअर प्रॉडक्ट्स निवडताना..

वृत्तसंस्था
मंगळवार, 15 नोव्हेंबर 2016

गुलाबी थंडीचा आनंद घ्यायला आपल्याला जेवढे आवडते तेवढाच धोका या काळात आजारी पडण्याचाही असतो. थंडीत आरोग्याची काळजी घेण्याची गरज असते. तसेच सगऴ्यात महत्त्वाचे असते त्वचेची काळजी घेणे.

हिवाळ्यात थंडीमुळे त्वचा कोरडी पडते. त्यामुळे तिची योग्य ती काळजी घेणे जरूरीचे असते. अशा वेळी बॉडी केअर प्रॉडक्ट्स निवडण्यासाठी या काही टिप्स.. 

साबण- थंडीमध्ये वापरण्यासाठी ज्या साबणाची आपण निवड करतो त्याच्या कंटेंटमध्ये "टिएफएम" (TFM) किती आहे याची माहिती करुन घ्या. टिएफएम म्हणजे 'टोटल फॅटी मटेरियल'. साबणात टिएफएम जेवढे जास्त तेवढा त्यात ऑईल कंटेंट जास्त. अशा साबणाच्या वापरामुळे तुमची त्त्वचा कोरडी पडणार नाही. 

असे साबण खरेदी करताना त्यात दोन प्रकार असतात. साबणातला फॅट कंटेंट हा प्रणिज किंवा वनस्पतीजन्य असतो. एलर्जीक असणार्‍यांनी प्राणीज चरबीपासून बनवलेले साबण, क्रीम किंवा बॉडीलोशन वापरू नये. खाद्यपदार्थांवर लाल किंवा हिरवा रंगाच्या मार्कवरुन आपण त्यातील त्यातील फॅट वनस्पतीज किंवा प्राणीज आहेत याची माहिती घेऊ शकतो. परंतु, पण स्किन केअर प्रॉडक्ट्समध्ये असे निशाण नसते. म्हणून आपल्या आवडीनुसार व शरीर प्रकृतीनुसार योग्य उत्पादनाची निवड पूर्ण लेबल वाचून किंवा बघूनच करावी. तसेच साबणाचे उत्पादन चांगल्या कंपनीचेच आहे अशी देखील खात्री करुन घ्यावी.

बॉडी लोशन - थंडीमध्ये त्वचेसाठी बॉडीलोशन वापरणे उत्तम. बॉडीलोशनची खरेदी करताना चांगल्या उत्पादनाची खात्री करुन घेतानाच आपल्या स्किन टाईप प्रमाणे बॉडी लोशनची निवड करावी. त्याची माहिती उत्पादनाच्या लेबलवर उबलब्ध असते. त्याच बरोबर बॉडी लोशन मधील 'आवश्यक बाष्पशील तेल' (essential volatile oils), 'वनस्पती अर्क' (plant extracts) , 'ईमोलेन्ट' (emollients) याची माहिती करुन घ्यावी. essential volatile oils हे बॉडी लोशन्समध्ये त्याच्या फ्रेग्रन्स आणि त्वचेमध्ये ओलावा निर्माण करण्यासाठी वापरले जातात आणि हा ओलावा टिकून राण्यासाठी emollients चा उपयोग होतो. 
 
फेसवॉश- फेसवॉश खरेदी करताना फक्त चांगल्या ब्रँडचाच विचार करणे महत्त्वाचे नसते. कारण अनेकांना चांगल्या ब्रँडचे फेसवॉश वापरुनही त्याचे प्रभावी परिणाम मिळत नाहीत. फेसवॉश वापरताना तुमची त्वचा कोणत्या प्रकारची आहे, हा मुद्दा महत्त्वाचा ठरतो. कारण, प्रत्येक प्रकारच्या त्वचेसाठी फेसवॉशची वेगळी उत्पादने तयार केली जातात. बहुतांश फेसवॉशमध्ये तेलाचा वापर केला जातो. किंवा कोरड्या त्वचेसाठी क्रिमी फेसवॉश देखील बाजारात उपलब्ध आहेत. थंडीसाठी असे फेसवॉश निवडणे चांगले.

लिपबाम - थंडीत लिप लोशन किंवा लिप बाम लावुनच बाहेर पडावे. लिप बाम्समध्ये अलीकडे खुप विविध फ्डेवर्स उपलब्ध आहेत त्यांचा वापर करावा. लिपबाममध्येही emollients चा वापर केलेला असतो. त्याची माहिती करुन खरेदी करताना करुन घ्यावी. लिपस्टिकचा वापर करत असाल तर लिप प्रोटेक्टर म्हणूनही लिपबामचा उपयोग होतो. किंवा कलर लिपबामचा वापर केल्यास लिपस्टिक वापरण्याची गरज नाही. 

Web Title: how to choose body care product for winter season