अंधारात बुडालेल्या आदिवासी वाड्या प्रकाशमान

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 जुलै 2017

अनेक वस्त्यांतील घराघरांत सिंगल फेज विजेचे आगमन 
इगतपुरी - तालुक्‍यातील सिन्नर विधानसभेला जोडलेल्या टाकेद गटातील अतिदुर्गम भागातील अनेक वर्षे अंधारात राहिलेल्या देवाचीवाडी, पाटील वस्ती, मदगे वस्ती, बेंडकोळी वस्ती, वाघ्याचीवाडी, गवळीदेव वस्ती आदी अनेक वाड्यांत विजेचे आगमन झाले. अनेक वर्षांपासून विजेअभावी अंधारात राहिलेल्या या वाड्यांना सिन्नरचे आमदार राजाभाऊ वाजे यांच्या प्रयत्नातून वीज लाभली असून, या आदिवासी वाड्यांतील अंधार मिटला आहे. 

आज या कामाचा पाहणी दौरा झाला. वीज वितरण कंपनीने २५ केव्ही रोहित्र बसवून सिंगल फेज वीज घराघरांत पोचविली आहे. या वेळी आमदार वाजे यांनी, खेड गटात विविध प्रकारची सर्वसमावेशक विकासकामे झाली आहेत. आदिवासी भागात पाणी, स्वच्छता, आरोग्य, वीज अशा महत्त्वपूर्ण विषयांवर सामाजिक आर्थिक धोरण ठेवून विकास साधला जाणार असून, आदिवासी नागरिकांचे जीवनमान उंचवण्यासाठी विकासकामांबरोबरच प्रत्येक घरात वीज पोचविली जाणार असल्याचे पाहणीदरम्यान सांगितले. 
दुर्गम वाडीवस्तीवर जीवन जगणाऱ्या नागरिकांना प्रथमच घराघरांत वीज पोचल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले.

पाहणी दौऱ्याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य हरिदास लोहकरे, उपतालुकाप्रमुख हरिभाऊ वाजे, पंचायत समिती सदस्य विमल गाढवे, साहेबराव कणकर, रंगनाथ कचरे, कैलास वाजे, भास्कर वाजे, भगवान बऱ्हे, राजाराम बऱ्हे, नंदू गभाले, शंकर चोथवे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

गेल्या अनेक वर्षांपासून आमची वाडी विजेअभावी वंचित होती. मात्र आमदार वाजे यांनी वेळीच दखल घेऊन आमच्या वाड्यांना वीज उपलबध करून दिल्याने अंधाराचा सामना करणे आता थांबले आहे.
- मच्छिंद्र मधे, ग्रामस्थ, परदेशवाडी

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: igatpuri news electricity to tribal society