परिस्थितीवर मात करत चालक बनला मालक

परिस्थितीवर मात करत चालक बनला मालक

पुणे - शिक्षण केवळ बारावी, त्यामुळे चांगल्या ठिकाणी नोकरी मिळाली नाही, उद्योग सुरू करायचा तर घरची आर्थिक स्थिती हलाखीची. या परिस्थितीत हताश न होता शंकर पुरोहित यांनी स्वतः मोटार विकत घेतली आणि सध्या ते ओला कंपनीच्या माध्यमातून दरमहा किमान ३५ हजार रुपयांचे उत्पन्न मिळवित आहेत. 

वारजे येथे राहणारे शंकर पूर्वी एका खासगी मोटारीवर चालक म्हणून नोकरी करीत होते. मात्र, त्यातून मिळणारा पगार हा कुटुंबाच्या दैनंदिन गरजादेखील भागवत नव्हता. त्यामुळे शंकर यांनी मोटार घेऊन स्वतःचा व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांनी कर्ज काढून ‘स्विफ्ट डिझायर’ मोटार घेतली व ती ओला कंपनीला लावली. कॅबच्या व्यवसायातून एका वर्षातच त्यांची आर्थिक स्थिती  सुधारली. 

याबाबत शंकर म्हणाले, ‘‘खासगी मोटारीवर चालक म्हणून काम करणे आणि स्वतःची मोटार असणे यात जमीन-अस्मानाचा फरक आहे. ही जाणीव मला मोटार घेऊन ‘ओला’ला लावल्यानंतर झाली. नोकरी करीत असताना ठराविक पैसे मिळायचे. त्यातून ना कुटुंबाचा गाडा चालायचा ना मुलांची काही हौस-मौज व्हायची. त्यामुळे मित्राच्या सल्ल्यानुसार मी मोटार घेतली. रोज दहा तास काम केले तरी सुमारे दोन हजार रुपये मिळतात. त्यातून कुटुंबाचा खर्च भागतो. तसेच गाडीचे हप्ते देखील भरता येऊ शकता. एवढेच काय तर गेल्या काही महिन्यांपासून माझी चांगली बचत देखील झाली आहे. केवळ माझ्या एकट्याच्या उत्पन्नातून कुटुंबाची गरिबी दूर झाली असून संसाराचा गाडा सुरळीत सुरू 
आहे.’’

आणखी एक मोटार घेण्याचा विचार  
शंकर हे पत्नी, दोन मुले आणि आई-वडिलांसह वारजे येथे राहतात. ते मूळचे उस्मानाबाद येथील असून, नोकरीनिमित्त पुण्यात आले. भविष्यातील नियोजनाबाबत शंकर यांनी सांगितले की, ओलामधून किती पैसे कमवायचे हे आपल्यावर आहे. सकाळी ९ ते सायंकाळी ७ पर्यंत ‘ट्रीप’ केल्यास मला सुमारे दोन हजार रुपये मिळतात. अशीच परिस्थिती राहिली तर भविष्यात आणखी एखादी मोटार घेण्याचा विचार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com