आमचा प्रत्येक रविवार निसर्गसंवर्धनासाठी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 फेब्रुवारी 2019

वारजे - बजाज अर्पण ग्रुपतर्फे वारज्यातील ईशान संस्कृती सोसायटीतील लहान मुलांनी मिळून प्रत्येक रविवार निसर्ग संवर्धनासाठी द्यायचा ठरविले आहे. बियांपासून रोप तयार करून ती वारजे भागातील विविध टेकडीवर लावण्याचा उपक्रम ही मुले गेल्या दोन वर्षांपासून राबवत आहेत. 

सोसायटीतील लहान मुले प्रत्येक रविवारी एकत्रित येतात. अभ्यासातून वेळ काढून पाच ते सहा तास ते या कामासाठी देतात.  

मागील वर्षी सोसायटीच्या आवारात १०० बियांपासून रोपे तयार करून त्याचे जूनमध्ये वारजे टेकडीवर यशस्वीरीत्या रोपण केले गेले.  या वर्षीदेखील २०० रोपांची लागवड करण्याचे मुलांनी ठरविले आहे. त्यामधील पहिली १०० रोपे तयार करण्याच्या कामाला रविवारी (ता. ११) सुरवात झाली. सर्व रोपे देशी आहेत. यामध्ये कडुनिंब, जांभूळ, बेल, आंबा, पिंपळ, वड व चिंच यांचा समावेश आहे. टेकडीवर लावलेल्या झाडांचे संवर्धन ही मुले निसर्ग मित्र ग्रुप, पतंजली योगा ग्रुप, टाटा मोटर्स ग्रुप यांच्या सहकार्याने करत आहेत. 

मुलांना लागणारी माती, पिशव्या, बियाणे आदी बजाज अर्पण ग्रुपतर्फे चंद्रकांत चौधरी आणि व्ही. रमेश यांनी उपलब्ध करून दिली. या कामात शीतल चौधरी, रिदम चौधरी, नागनाथ  चव्हाण, नवनाथ सूर्यवंशी, शिवाजी गांजाळे, जाचक यांनी मदत केली. यापुढील काळात मुलांच्या मदतीने सोसायटीत बिया जमा करण्याचा उपक्रम राबविण्यात येणार आहे. पावसाळ्यात सिंहगड परिसरात या बियांची लागवड करण्यात येतील, असे चंद्रकांत चौधरी यांनी सांगितले.

Web Title: Ishan Sanskruti Society Nature Conservation Child Motivation Initiative