जगन्नाथ बनले स्वच्छतादूत!

प्रशांत घाडगे
बुधवार, 23 मे 2018

पुणे  - तरुण वयातच आई-वडिलांचं निधन झालं. त्यातच पत्नीने साथ सोडली. मात्र त्यांनी जगण्याची उमेद सोडली नाही. लहानपणापासूनच जगन्नाथ देशपांडे यांनी कोणत्याही कामाची लाज वाटू दिली नाही. देशात स्वच्छता मोहिमेचा ‘इव्हेंट’ साजरा केला जात असताना, दुसरीकडे स्वच्छतेचे काम जगन्नाथबाबा २० वर्षांपासून करताहेत. डेक्कन व फर्ग्युसन रस्त्यासह पदपथांची साफसफाई करून स्वच्छतादूताची भूमिकाच ते बजावत आहेत. 

मूळचे भोर तालुक्‍यातील हरसण गावचे जगन्नाथ देशपांडे ६८व्या वर्षातही तरुणांना लाजवेल अशा पद्धतीने काम करत आहेत. तरुण असतानाच त्यांच्या आई-वडिलांचे निधन झाल्याने जगण्याचा प्रश्‍न उभा राहिला. गरिबीला कंटाळून पत्नीने साथ सोडली. भटकंती करीत अखेर ते डेक्कन परिसरात स्थिरावले आहे.

प्रामाणिकपणा आणि कष्टाळूपणामुळे जगन्नाथ हे स्थानिक दुकानदारांच्या कुटुंबातील एक सदस्य झाले आहेत. स्थानिक रहिवासी संतोष घुले पाटील म्हणाले, ‘‘जगन्नाथबाबा दररोज साफसफाई करून गुडलक चौकातील कचरा साठवून ठेवतात. त्यानंतर महापालिकेची गाडी येऊन तो कचरा घेऊन जाते. एक नागरिक परिसराची साफसफाई करण्यासाठी झटतो, हे कौतुकास्पद आहे.’’

पदपथ, चहा विक्रेते, हॉटेलबाहेर मी सफाई करतो. या कामात मला आनंद आणि चार पैसे मिळतात. पदपथांची स्वच्छता केल्यानंतर परिसरातील नागरिक मला जेवण देतात. नागरिक हेच माझे कुटुंबीय आणि हेच माझे घर बनले आहे.
- जगन्नाथ देशपांडे

दररोज सकाळी सहा वाजल्यापासून जगन्नाथ परिसराची स्वच्छता करण्यात मग्न असतो. अशा व्यक्तींकडे समाजातील एक घटक म्हणून पाहिले पाहिजे. जगन्नाथ यांनी स्वच्छतेबद्दलचा सामाजिक संदेशच दिला आहे.
- माउली जाधव, चहा विक्रेते

Web Title: jagannath deshpande cleaning campaign motivation