क्लार्क बनला जिल्हा लेखापरिक्षक अधिकारी

दीपक कच्छवा
शनिवार, 23 सप्टेंबर 2017

जिद्द चिकाटी सोडली नाही
प्रशातंने दिवसा ड्युटी व रात्री अभ्यास सुरू केला.त्याने सन 2015 मध्ये लोकसेवा आयोगाची स्पर्धा परीक्षा दिलेली होती.त्याचा निकाल 2016 ला लागला यात तो चांगल्या गुणानी उतीर्ण झाला. महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा ह्या विभागाची विभागीय स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन सहाय्यक  लेखा परीक्षक  अधिकारी म्हणून त्यांची उस्मानाबाद येथे निवड झाली.आपल्या मुलाला प्रशासकीय नोकरीत यश मिळविले हे समजताच त्याच्या आईचा अनंद गगनात मावेनासा झाला. प्रशांत सागंळे याने अजुन उच्च पदावर जाण्याची जिद्द कायम ठेवली असुन दोन दिवसापुर्वीच उस्मानाबाद येथे हजर झाला आहे.

मेहुणबारे ता.चाळीसगाव : घरची हलाखीची परिस्थितीची जाण ठेवुन आरोग्य खात्यात क्लर्क पदावर काम करीत राहिला. सोबत स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू ठेवत त्याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची  'वित्त व लेखा सेवा' यात चांगल्या गुणानी उत्तीर्ण होऊन यश संपादन केले. कुठल्याही परिक्षेसाठी अभ्यास करण्याच्या जिद्द ठेवली तर त्यात यश हमखास मिळते हेच,  या तरूणाने दाखवून दिले.

हातगाव (ता.चाळीसगाव) येथील   प्रशांत रमेश सांगळे हा  तरूण सात वर्षाचा असतांनाच त्यांचे वडील रमेश सांगळे यांचे निधन झाले.ते पोलिस दलात नोकरीला होते. प्रशांतची आई शोभाबाई यांना 1800 रूपये पेन्शन मिळत असत यावर एक मुलगा चार मुली यांचा सांभाळ करणे त्या माऊली समोर संकटच होते.

मामांनी केला सांभाळ
प्रशांतची घराची परिस्थिती हालाखीची असतांना त्याला  मामा व आजोबा यांची चांगली साथ मिळाली.प्रशातचे शिक्षण अंधारी (ता.चाळीसगाव) येथे पायी जावुन पहीली ते दहावी पर्यंतचे शिक्षण पुर्ण केले.अकरावी व बारावी न्याडोंगरी येथे पुर्ण केली. त्यानंतर पुढील शिक्षण प्रशातने  चाळीसगाव येथील राष्ट्रीय विद्यालयात ग्रॅज्युशन पर्यंत पुर्ण केले.त्यानंतर प्रशातला आपल्या   वडीलांच्या जागेवर अनुकंपात आरोग्य विभागात सन  2004  मध्ये कनिष्ठ साहाय्यक या पदावर नोकरी मिळाली.मात्र त्याने मनात बाळगलेली स्वप्न पूर्ण होणार नाही.आशी शक्यता दिसु लागली.एकीकडे घरात हालाखीची परिस्थिती त्यामुळे या सर्व गोष्टींचा विचार करून प्रशातंने झोडंगे ता.मालेगाव येथे आरोग्य विभागात पदभार स्वीकारला.त्यानंतर काही दिवसांनी प्रशातची बदली मेहुणबारे येथील ग्रामीण रुग्णालयात झाली.अपन गरिबीतून दिवस काढलेले असल्याने आपल्या आईला सुख देण्यासाठी यापेक्षाही चांगली नोकरी मिळावी म्हणून प्रशांतने मनाशी खुणगाठ बाधंली.

जिद्द चिकाटी सोडली नाही
प्रशातंने दिवसा ड्युटी व रात्री अभ्यास सुरू केला.त्याने सन 2015 मध्ये लोकसेवा आयोगाची स्पर्धा परीक्षा दिलेली होती.त्याचा निकाल 2016 ला लागला यात तो चांगल्या गुणानी उतीर्ण झाला. महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा ह्या विभागाची विभागीय स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन सहाय्यक  लेखा परीक्षक  अधिकारी म्हणून त्यांची उस्मानाबाद येथे निवड झाली.आपल्या मुलाला प्रशासकीय नोकरीत यश मिळविले हे समजताच त्याच्या आईचा अनंद गगनात मावेनासा झाला. प्रशांत सागंळे याने अजुन उच्च पदावर जाण्याची जिद्द कायम ठेवली असुन दोन दिवसापुर्वीच उस्मानाबाद येथे हजर झाला आहे.

नोकरी करतांना माझी सुरवातीपासुन स्पर्धा परिक्षा देण्याची ईच्छा होती.ही परिक्षा मी द्यावी यासाठी मला पत्नी छाया व आई शोभाबाई यांनी वेळोवेळी प्रोत्साहन दिले.आजोबा व मामाची खंबीर साथ लाभल्यामुळेच मी या पदापर्यंत पोचू शकलो.चिकाटीने अभ्यास केला तर यश हमखास मिळते.
- प्रशांत सांगळे, जिल्हा साहाय्यक लेखापरिक्षक अधिकारी उस्मानाबाद

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jalgaon news success stroy in chalisgaon