किनगाव येथे जलक्रांती अभियानातून जलपुनर्भरण

kingaon
kingaon

जळगाव - किनगाव (ता.यावल, जि.जळगाव) येथे लोकसहभाग आणि काही संस्थांच्या मदतीने मागील वर्षी जलक्रांती अभियान राबविण्यात आले. त्यामध्ये शेतकरी, ग्रामस्थांनी हिरिरीने सहभाग घेऊन नदीचे खोलीकरण, वाळूचे बंधारे आदी कामे केली. यामुळे शिवारातील कूपनलिकांची जलपातळी वाढली आहे.

गेल्या काही वर्षात किनगाव व परिसरातील विहिरी, कूपनलिकांची जलपातळी खालावत होती. या परिसरात कांदा, केळी, कापूस, भाजीपाला पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड आहे. गावशिवारातील शेतकरी पिकांचे दर्जेदार उत्पादन घेतात. परंतु पाणीच कमी होत असल्याने बारमाही बागायती शेती कशी करायची, अशी अडचण सर्वांच्या समोर होती. 

गावशिवारातील परिस्थिती लक्षात घेऊन मागील वर्षी माजी आमदार रमेश चौधरी यांनी परिसरातील ग्राम प्रतिनिधींची बैठक बोलावली. कासारखेडे, डांभुर्णी, चिंचोली, नायगाव, वाघझिरा आदी ग्रामपंचायतींचे प्रतिनिधी, शेतकरी या बैठकीत सहभागी झाले. 

जलपातळी कशी वाढवायची, त्यासाठी काय करायचे याबाबत सावदा (ता. रावेर) येथील स्वामिनारायण गुरुकुलाचे भक्तीप्रसाद महाराज, महंत जनार्दन हरी महाराज, तापी पाटबंधारे महामंडळाचे माजी अधीक्षक अभियंता व्ही.डी.पाटील , भक्ती किशोर महाराज, पाटबंधारे विभागातील निवृत्त अभियंता के.पी.पाटील यांनी मार्गदर्शन केले. नदीचे खोलीकरण, पाणी कुठे जिरू शकते, सातपुड्यातील बझाडा झोन आदींबाबत तांत्रिक माहिती देण्यात आली. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

लोकसहभागातून जलसंधारण  
लोकसहभाग, संस्थांची मदत यातून किनगाव, डांभुर्णी व इतर भागात सातपुडा पर्वतातून येणारे नाले, लहान नद्यांवर ८० बंधारे तयार करण्यात आले. नद्यांमध्ये १०० ते १५० फूट लांब, ३० फूट रुंद आणि १५ फूट खोल चर खोदण्यात आले. किनगाव परिसरातही चर तयार करण्यात आला. लव्हाळ, नरहानी, चिताळी, ढोल्या, मोह, लेंडी आदी नाले व उपनद्यांवर हे चर खोदण्यात आले. नदीचे खोलीकरण ठिकठिकाणी करण्यात आले. याचा मागील वर्षीच पावसाळ्यात लाभ झाला. शिवारातील अनेक कूपनलिका, विहिरींची पाणीपातळी वाढली. यंदाही जलसंधारणाचे काम घेण्याचे ठरले होते. तसे नियोजन केले, परंतु उन्हाळ्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने हे काम लांबणीवर पडले होते. या कामासाठी शेतकरी नेते कडूअप्पा पाटील, प्रमोद पाटील, दिलीप पाटील, राहुल पाटील, केतन चौधरी, उल्हास चौधरी, अरूण पाटील, चंद्रकांत चौधरी, प्रफुल्ल पाटील कैलास वराडे, गोपाळ बारी यांनी सहकार्य केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com