शेतमजुरीचे काम करत दुग्ध व्यवसायात घेतली भरारी

अक्षय गुंड
सोमवार, 5 मार्च 2018

दादासाहेब नागटिळक यांना चार भाऊ व तीन बहिणी असल्याने घरची आर्थिक परिस्थिती बेताची होती. पदवीचे शिक्षण पुर्ण झाल्यानंतर नोकरी मिळत नसल्याचे लक्षात येताच. माढा तालुक्यातील बागयतदार परिसर असलेल्या आलेगाव येथे दादा मोटे यांचे शेत बटईने करण्यास सुरूवात केली.

उपळाई बुद्रूक (जिल्हा सोलापूर) : घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने दुसर्‍याच्या शेतात शेतमजुरीचे काम करत स्वतःचा दूध व्यवसाय सुरू केलेल्या उपळाई बुद्रूक येथील दादासाहेब नागटिळक यांच्या ३५ लीटर दुध संकलन केंद्राचे आज ४० हजार लीटर दुध संकलनापर्यंथ भरारी घेतली आहे.

दादासाहेब नागटिळक यांना चार भाऊ व तीन बहिणी असल्याने घरची आर्थिक परिस्थिती बेताची होती. पदवीचे शिक्षण पुर्ण झाल्यानंतर नोकरी मिळत नसल्याचे लक्षात येताच. माढा तालुक्यातील बागयतदार परिसर असलेल्या आलेगाव येथे दादा मोटे यांचे शेत बटईने करण्यास सुरूवात केली. याच दरम्यान ऊसाची लागवडीची कामे घेणे तसेच गावोगावी कार्यक्रमात दूरचित्रवाणीवर कार्यक्रम दाखविणे अशी कामे करत असताना. शेतमजुरीला जोडव्यवसाय म्हणुन गावोगावी लग्नसमारंभ अश्या कार्यक्रम प्रसंगी (व्हिसीआर) दूरचित्रवाणी संचवरून लोकांना व्हिडिओ  दाखवण्याचेही काम केले. मनात कुठेतरी खंत वाटयाची स्वतःचा काहीतरी उद्योग असावा. म्हणुन त्यांनी मनाशी खुणगाठ बांधुन १९९९ साली उपळाई गावी परत आले.  

माढा येथील सन्मती पतसंस्थेतुन कर्ज काढून जिल्हा दुध संघाच्या दुध संकलन केंद्राची स्थापना18 वर्षापूर्वी केली. सुरूवातीला गेली काही वर्ष अनेक अडचणींचा सामना करत कष्ट, जिद्द व चिकाटीच्या जोरावर आत्मविश्वासाने सामोरे जात. रोज फक्त ३५ लीटर दुध संकलन होत असताना देखील, दुध संकलन केंद्र सुरूच ठेवले. नंतर ग्रामीण भागात दुग्ध व्यवसायात खाजगी दुग्ध संस्थानी शिरकाव केल्याने, इंदापुर येथील सोनाई शीतकरण केद्रांच्या स्थापनेला ३५ लीटर एवढेच दुध घालण्यास सुरूवात केली. नंतर अंतर जास्त असल्या कारणाने पुन्हा सिध्दामृतला दुध घालण्यास सुरूवात केली. पण नंतर काही दिवसांनी सोनाई परिवारांचे दशरथ माने यांनी घरी भेट देऊन दुध सोनाईला घालण्याचा आग्रह केला. दुग्ध व्यवसायासाठी लागेल ती मदत करतो असे सांगितले. इथूनच दादासाहेब नागटिळक यांच्या दुग्ध व्यवसायाला कलाटणी मिळाली. प्रथम एक दुध संकलन केंद्र असल्याने एक वाहन होते. नंतर हळूहळू दुग्ध व्यवसायात प्रगती होत गेली. व आज एका दुध संकलन केंद्राचे रूपांतर उपळाई बुद्रुक, लऊळ, मानेगाव येथे दुध शीतकरण केंद्रात झाले. व एका वाहनांचे रूपांतर आज २० वाहनात झाले आहे. एकेकाळी स्वतः साठी काम शोधणारे दादासाहेब नागटिळक यांनी आज दुग्ध व्यवसायामुळे शंभरहुन अधिक कुटुंबातील युवकांच्या हाताला काम मिळवुन दिले आहे. 

दादासाहेब नागटिळक यांच्या पंचरत्न दुध शीतकरण केंद्रात आज दरोरज ४० हजार लीटर दुध इतके संकलित होत आहे. जिद्द असेल तर मार्ग दिसेल याप्रमाणे शेतमजुर ते दुग्ध व्यवसायात दादासाहेब नागटिळक यांनी घेतलेली भरारी आजकाल काम नाही म्हणुन बसणार्यांना युवक वर्गाला आदर्श घेण्यासारखीच आहे. ज्या गावात आपली जडणघडण झाली. त्या गावासाठी म्हणुन श्री नागटिळक यांनी सामाजिक बांधिलकी राखत गावातील गोरगरीब कुटुंबाला तसेच शाळेसाठी मदत करत असताना दिसतात.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kahi sukhed Dadasaheb Nagtilak success story