साठीनंतरच्या वयातली स्मृती टिकवण्यासाठी "मेमरी क्‍लब'

साठीनंतरच्या वयातली स्मृती टिकवण्यासाठी "मेमरी क्‍लब'

कल्याणी पाटील व डॉ. नूतन मांडके या "मेमरी क्‍लब' हा आगळावेगळा उपक्रम राबवतात. पुण्यात कोथरूडमधील स्वप्नशिल्प सोसायटीतील 30 महिला याचा लाभ घेतात. साठीनंतरच्या वयात विसरण्याचं प्रमाण वाढतं. तसं होऊ नये म्हणून हा बौद्धिक जिम आहे.

बातम्या ऐकण्यासाटी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दर गुरुवारी सायंकाळी पाच ते सहा क्‍लब हाऊसमध्ये जमून स्मृतिवर्धिनी मेमरी क्‍लबमध्ये स्मरणशक्ती वाढवणारे मजेशीर खेळ खेळणं हा परिपाठ त्या 30 जणींनी गेले नऊ महिने सुरू ठेवला. त्यामुळे येणारा उत्साह, तरतरी, बुद्धीला धार लावण्यातली गंमत अनुभवली.

कल्याणी पाटील म्हणाल्या, ""मी आणि डॉ. नूतन मांडके या क्‍लबचं कामकाज बघतो. सदस्यांना दर भेटीत नवे खेळ, नवे कूट प्रश्न, नवे व्यायाम देण्याचा आमचा प्रयत्न असतो. मन एकाग्र करण्यासाठी ओंकार जप, गायत्री मंत्र, विठ्ठल नामस्मरण आदींचा समावेश असतो. कदम ताल किंवा खुर्चीत बसून ऊठ-बस करणं, ते करताना हात विशिष्ट प्रकारे ठेवणं यातून तालबद्ध शारीरिक हालचाली करून घेतल्या जातात. शब्दकोडी सोडवणं, स्मृतीला चालना देणारे प्रश्न विचारण्यावर भर असतो. डॉ. श्‍यामाप्रसाद मुखर्जी उद्यानाला लागून असलेल्या, ज्येष्ठांसाठीच्या विरंगुळा केंद्रात मंगलाताई जोगळेकर यांनी स्थापन केलेल्या मेमरी क्‍लबचा आदर्श समोर ठेवून आम्ही हा उपक्रम राबवू लागलो. हे पाहून पुण्यात चार व नाशिकमध्येही चार मेमरी क्‍लब सुरू झाले. काही ठिकाणी स्त्री व पुरुष सदस्य आहेत.''

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

डॉ. नूतन मांडके यांनी सांगितलं की, वैद्यकीय ज्ञानाचा उपयोग सर्वांसाठी करण्यावर माझा भर असतो. उजव्या हाताचा वापर करणाऱ्यांनी त्याच कामांसाठी डाव्या हाताचा वापर केल्यास, त्याला संदेश देणारी मेंदूतील यंत्रणा तल्लख होते. एकावेळी एकाहून अधिक कामं करण्यानेही मेंदूची सतर्कता वाढीस लागते. सर्जनशीलतेला चालना दिल्यानंही बुद्धीला धार लागते. वेगवेगळ्या कामांसाठी उत्तम "शॉर्ट कट' शोधणं हे सुद्धा मेंदू तल्लख ठेवायला उपयोगी पडतं. याबरोबरच संतुलित आहारही महत्त्वाचा. आपल्याला अल्झायमर (स्मृतिभ्रंश) तर होणार नाही ना, अशा शंकाकुशंकांऐवजी आमच्या सदस्यांना नवी उमेद व आत्मविश्वास देणारा मेंदूचा खुराक दर आठवड्याला मिळतो.''

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com