कोदवली नदीपात्रात श्रमदानातून वनराई बंधारा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 मार्च 2017

राजापूर - शहरातील जय महाराष्ट्र मित्रमंडळ आणि श्री अनिरुद्ध उपासना केंद्राच्या पुढाकाराने कोदवली नदीपात्रामध्ये श्रमदानातून वनराई बंधारा बांधण्यात आला आहे. दिवसागणिकच्या वाढत्या उष्म्याची झळ राजापूर शहराला बसत असताना या वनराई बंधाऱ्यांमध्ये होणारा पाणीसाठा पाणीटंचाईच्या पार्श्‍वभूमीवर उपयुक्त ठरणार आहे. 

हा वनराई बंधारा बांधण्यासाठी पालिकेतील विरोधी गटनेते विनय गुरव, माजी नगरसेवक विजय गुरव आदी ग्रामस्थ सहभागी झाले होते.  

गेल्या काही दिवसांपासून हवामानामध्ये बदल झाला असून त्यामध्ये हवेतील उष्म्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे जलस्त्रोत कमी होऊ लागले आहेत. त्यामध्ये राजापूर शहराच्या पाणीपुरवठ्याचा मुख्य जलस्त्रोत असलेल्या कोदवली येथील सायबाच्या धरणातील पाणीसाठ्याचा समावेश आहे. भविष्यातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जय महाराष्ट्र मित्रमंडळ आणि श्री अनिरुद्ध उपासना केंद्र पुढे सरसावले आहे. या मंडळातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी कोदवली नदीवर हर्डी येथे श्रमदानातून वनराई बंधारा बांधला आहे. 

पालिकेतील विरोधी गटनेते श्री. गुरव, माजी नगरसेवक श्री. गुरव यांच्यासह श्रीधर गुरव, प्रभाकर गुरव, वैभव गुरव, जगदीश गुरव, अनिल गुरव, शशिधर गुरव, मंगेश गुरव, लवेश गुरव, विघ्नेश अमरे, विद्या गुरव, अंजनी गुरव, आत्माराम गुरव, श्री अनिरूद्ध उपासना केंद्रातील प्रकाश गुरव, कैलास कोठारकर, सौ. चव्हाण, सौ. कोठारकर आदींसह मोठ्यासंख्येने ग्रामस्थ सहभागी झाले होते. बंधाऱ्यामध्ये चांगला पाणीसाठा झाला आहे.

Web Title: kodvali river vanrai bandara