अभंगातून पर्यावरणाचा संदेश; स्मशानभूमीत झळकणार डिजीटल

आनंद जगताप
शुक्रवार, 4 मे 2018

पन्हाळा - हत्ती, घोडा, उंट पालखी तू म्हणशी माझी रे...तुझया पदरी तीन हात मांजरपाट रे... हा जीवनाचा मंत्र देणारा रक्षा विसर्जनाचा अभंग आता गावोगावच्या स्मशानभूमीत झळकणार असून पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्याचा विडा पन्हाळा तालुक्‍यातील पोर्ले तर्फ ठाणे गावातील तरुणांनी उचलला आहे. या अभंगाचे १३० डिजिटल फलक त्यांनी तयार केले असून पन्हाळा, शाहूवाडी आणि करवीर तालुक्‍यातील नदी काठच्या गावच्या स्मशानभूमीत लावण्यास सुरवात केली आहे.

पन्हाळा - हत्ती, घोडा, उंट पालखी तू म्हणशी माझी रे...तुझया पदरी तीन हात मांजरपाट रे... हा जीवनाचा मंत्र देणारा रक्षा विसर्जनाचा अभंग आता गावोगावच्या स्मशानभूमीत झळकणार असून पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्याचा विडा पन्हाळा तालुक्‍यातील पोर्ले तर्फ ठाणे गावातील तरुणांनी उचलला आहे. या अभंगाचे १३० डिजिटल फलक त्यांनी तयार केले असून पन्हाळा, शाहूवाडी आणि करवीर तालुक्‍यातील नदी काठच्या गावच्या स्मशानभूमीत लावण्यास सुरवात केली आहे. पाणी प्रदूषणास आळा बसावा, लोकांना पर्यावरणाचे महत्त्व कळावे हा हेतू हा फलक लावण्यामागचा आहे. नदीकाठची गावे झाल्यानंतर आणखी फलक तयार करून बांदारी परिसरातील स्मशानभूमीत लावण्यात येणार आहेत. 

पोर्ले तर्फ ठाणे येथे निसर्गमित्र दिनकर चौगुले यांनी कावडीने 
पाणी घालून वनराई फुलवली आहे. या वनराईत बऱ्याच औषधी 
वनस्पती आहेत. लोकांत झाडांबददल प्रेम निर्माण व्हावे, प्रदूषण टाळण्यास मदत व्हावी म्हणून येथे स्मृतीवन करण्याचा विचार त्यांच्या मनात डोकावला, आणि त्यानी आपल्या मित्राना हा विचार बोलून दाखवला, कर्मधर्म संयोगाने त्यांच्याच शेजारचे पांडुरंग महाजन मयत झाल्याने, त्यांची मुले दिगंबर आणि प्रदीप यांनी वडिलांची रक्षा त्याना जमीन नसल्याने, नदीत विसर्जित करण्याऐवजी भैरवनाथ वनराईला देण्याचा निर्णय घेतला आणि पांडुरंग यांच्या नावाने एक झाड लावून त्या झाडाला ही रक्षा घालण्यात आली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kolhapur News Eco Friendly Digital board in Graveyard