यकृताचे दान ठरले रुग्णासाठी जीवनदान

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 मे 2018

औरंगाबाद - एकुलता एक मुलगा ब्रेनडेड झाल्यावर वडिलांनी अवयवदानाचा निर्णय घेतला आणि पुण्याच्या एका गरजूला वेळेवर यकृत मिळून प्राण वाचले. औरंगाबादच्या या तरुणाच्या यकृताचे मंगळवारी (ता. एक) यशस्वी प्रत्यारोपण करण्यात आले.

औरंगाबाद - एकुलता एक मुलगा ब्रेनडेड झाल्यावर वडिलांनी अवयवदानाचा निर्णय घेतला आणि पुण्याच्या एका गरजूला वेळेवर यकृत मिळून प्राण वाचले. औरंगाबादच्या या तरुणाच्या यकृताचे मंगळवारी (ता. एक) यशस्वी प्रत्यारोपण करण्यात आले.

रामनगर येथील तरुणाला चार दिवसांपूर्वी रक्ताची उलटी झाल्यावर त्याला उपचारासाठी एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. ३० एप्रिलला तो ब्रेनडेड झाला. त्यानंतर अवयवदानाला त्याच्या नातेवाइकांनी संमती दिल्यानंतर प्रक्रियेला सुरुवात झाली.  हृदयावर सूज असल्याने हृदयदान करणे शक्‍य नव्हते. तसेच किडनी स्टोनचे ऑपरेशन झालेले असल्याने किडनीदेखील उपयोगात येणार नव्हती. यकृत तपासणीनंतर गरजू रुग्णास देण्यास योग्य असल्याचा निर्वाळा डॉक्‍टरांनी दिला. शस्त्रक्रिया करण्याचे नियोजन झाले.  पुणेस्थित झेडटीसीसी विभागाला यकृत उपलब्ध असल्याची बाब कळविण्यात आली. तेथे एका रुग्णाला यकृताची आवश्‍यकता होती. पुण्याहून आलेल्या डॉक्‍टरांकडे यकृत सोपविण्यात आले व पुण्यात प्रत्यारोपण करण्यात आले.

ब्रेनडेड तरुणाचे वडील रिक्षाचालक असून, तो त्यांचा एकुलता एक मुलगा होता. त्यांनी योग्य वेळी अवयवदानासाठी संमती दिली. ही बाब नक्कीच प्रेरणादायी आहे. त्यामुळे एका रुग्णाच्या जीवनात चैतन्य निर्माण झाले.
- डॉ. प्रवीण सूर्यवंशी, उपअधिष्ठाता, एमजीएम रुग्णालय.

Web Title: Liver donate patient life saving motivation humanity