तुम्ही कचरा टाका...  आम्ही रांगोळी काढू!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 जानेवारी 2018

जुन्नर - जुन्नर नगरपालिकेच्या वतीने घंटागाडीच्या माध्यमातून दररोज शहरातील कचरा गोळा केला जातो. मात्र घंटागाडीत कचरा न टाकता तो सार्वजनिक ठिकाणी रस्त्याकडेला टाकणाऱ्यांच्या विरोधात आरोग्य विभागाने गांधीगिरीचा मार्ग अवलंबण्यास सुरवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून टाकलेला कचरा उचलून त्या ठिकाणी स्वच्छतेचा संदेश देणारी रांगोळी काढण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. 

काल शहरातील पंधरा ठिकाणी अशा प्रकारच्या स्वच्छतेच्या संदेश देणाऱ्या रांगोळ्या काढण्यात आल्याचे आरोग्य विभागप्रमुख प्रशांत खत्री यांनी सांगितले. मंगळवारी ज्या ठिकाणी रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या त्या ठिकाणी आजही रांगोळी काढण्यात आली. आता येथे कचरा टाकणे बंद झाल्याचे दिसून येत आहे. सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. मात्र शहराची व्याप्ती पाहता अनेकदा हा कचरा कोणी टाकला यावर लक्ष ठेवणे प्रशासनास शक्‍य होत नसल्याने हा मार्ग अवलंबण्यात आल्याचे सांगण्यात आले. स्वच्छ सर्वेक्षण २०१८ स्पर्धेनुसार पालिकेच्या वतीने शहरात सार्वजनिक स्वच्छता राखण्याचे काम केले जात असून, यासाठी असणाऱ्या ॲपवर नागरिकांनी स्वच्छतेच्या संदर्भातील तक्रारी कराव्यात, असे आवाहन केले आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: maharashtra news junnar rangoli garbage