गावातील प्रत्येक मुलीच्या लग्नात करताहेत दहा हजारांची मदत

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 25 फेब्रुवारी 2018

खामसवाडी - शिवजयंतीचे औचित्य साधून खेर्डा (ता. कळंब) येथील युवकांनी एकत्रित येत सुकन्या विवाह सहयोग योजना राबविण्याचा स्तुत्य उपक्रम सुरू केला आहे. मित्रप्रेम युवा मंच स्थापन करीत या माध्यमातून गावातील युवक प्रत्येक मुलीच्या लग्नासाठी दहा हजार रुपयांची मदत करणार आहेत. या सुकन्या विवाह सहयोग योजनेचा प्रारंभ युवकांनी बुधवारी (ता. २१) गावातील बाबासाहेब पांडुरंग जाधव यांच्या मुलीच्या लग्नासाठी १० हजार रुपयांची मदत देऊन करण्यात आला.

कळंब पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक डी. एस. बोरिगिड्डे यांच्या हस्ते या योजनेचा प्रारंभ करण्यात आला. खेर्डा येथील युवकांनी शिवजयंतीचे औचित्य साधून ही योजना गावातील मुलींसाठी सुरू केली आहे. गावातील प्रत्येक मुलीच्या लग्नात १० हजार रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी मित्रप्रेम युवा मंचची स्थापना करण्यात आली आहे. ही योजना सुकन्या विवाह सहयोग नावाने सुरू केली असून, गावातील मुख्य चौकात तसा फलक लावण्यात आला आहे.  या फलकाचे अनावरण व योजनेचा प्रारंभ श्री. बोरिगिड्डे यांचे हस्ते करण्यात आला. या उपक्रमात गावातील सर्व जाती-धर्माचे आतापर्यंत २२ युवक सहभागी झाले आहेत.

बुधवारी (ता.२१) गावातील बाबासाहेब पांडुरंग जाधव यांच्या मुलीच्या लग्नासाठी १० हजार रुपयांची मदत करून योजनेचा प्रारंभ युवा मंचने केला असल्याचे प्रदीप जाधव यांनी सांगितले. गावातील प्रत्येक मुलीच्या लग्नास १० हजार रुपयांची मदत करण्याचा निर्णय घेणारे सर्व सहभागी युवक शेतकऱ्यांचीच मुले आहेत. कष्ट करून कमाविलेल्या पैशातून गावातील मुलींच्या लग्नास हातभार लावणाऱ्या या मित्रप्रेम युवा मंचचे सर्वत्र कौतुक होत आहे. 

मित्रप्रेम मंचात शरद जाधव, रणजित जाधव, प्रदीप जाधव, चाँदपाशा सय्यद, अनंत लिके, रवींद्र लोकरे, अन्वर बेग, संजय कांबळे, अमोल लिके, नानासाहेब जाधव, ज्ञानेश्वर लोकरे, बापूराव जाधव, कैलास लोमटे, दीपक बनसोडे, नासिन शेख, सोमनाथ लिके, प्रमोद लोकरे, तानाजी लिके, दिलीप जाधव, इर्शाद शेख, सतीश जाधव, अजय जाधव यांचा समावेश आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news khamaswadi news marriage help