प्लॅस्टिकमुक्त देशासाठी झटणारे ‘सागर मित्र’

मीनाक्षी गुरव
बुधवार, 14 मार्च 2018

प्लॅस्टिकमुक्त शहराचे आणि देशाचे स्वप्न साकार करण्यासाठी सुमारे दीडशे शाळांमधील एक लाख ३४ हजार विद्यार्थी ‘दूत’ बनून काम करत आहेत. ते दरवर्षी घराघरांतील ३० ते ४० टन प्लॅस्टिक कचरा गोळा करतात आणि शाळेमार्फत तो पुनर्प्रक्रिया करणाऱ्या संस्था किंवा कंपन्यांना देतात.

प्लॅस्टिकमुक्त शहराचे आणि देशाचे स्वप्न साकार करण्यासाठी सुमारे दीडशे शाळांमधील एक लाख ३४ हजार विद्यार्थी ‘दूत’ बनून काम करत आहेत. ते दरवर्षी घराघरांतील ३० ते ४० टन प्लॅस्टिक कचरा गोळा करतात आणि शाळेमार्फत तो पुनर्प्रक्रिया करणाऱ्या संस्था किंवा कंपन्यांना देतात.

शहर व देश प्लॅस्टिकमुक्त करण्याच्या चळवळीत लहान मुलांना सहभागी करून घेण्यासाठी ‘सागर मित्र’ ही संस्था कार्यरत आहे. द ॲकॅडमी ॲडव्हायजरीमार्फत  (टीएए) या संस्थेने २०११पासून हा उपक्रम सुरू केला आहे. प्रारंभी एका शाळेतील दीडशे मुलांना एकत्रित घेऊन या उपक्रमाची सुरवात झाली. पाण्याच्या माध्यमातून पृथ्वीशी असलेले नाते जोडण्याचा प्रयत्न या उपक्रमाद्वारे केला जात आहे. शहरा-शहरांतून, गावा-गावांतून शेकडो टन प्लॅस्टिक कचरा अप्रत्यक्षरीत्या नदीमध्ये जाते. 

नदीमार्फत लाखो टन प्लॅस्टिक समुद्रात जात आहे. संयुक्त राष्ट्रांच्या २०१६मध्ये झालेल्या एक बैठकीत समुद्रातील चारपैकी एका माशांच्या पोटात प्लॅस्टिक आढळून येत असल्याचे संशोधन समोर आले. तेव्हापासून या प्रश्‍नाचे गांभीर्य लक्षात येण्यास सुरवात झाली. ‘टीएए’मार्फत २०१३पासून सुरू असलेल्या हा उपक्रम ‘सागर मित्र’ म्हणून ओळखला जाऊ लागला आणि पुढे त्याच नावाने संस्थेचे कामकाज सुरू झाले.

संस्थेचा आगामी उपक्रम  
पुणे, सोलापूर, नगर जिल्ह्यांतील १५ हजार १०१ शाळांमधील सुमारे ५० लाख विद्यार्थ्यांना या उपक्रमांशी सोडून घेण्याचे नियोजन करणे. त्यासाठी शिक्षकांना प्रशिक्षण देणे, असा प्रस्ताव सागर मित्र संस्थेकडे आला आहे. यावर लवकरच काम सुरू होईल, असे संस्थेचे विनोद बोधनकर यांनी सांगितले.

विद्यार्थी हे करतात
महिनाभर घरांमध्ये साचलेला प्लॅस्टिक कचरा गोळा करतात.
ठराविक दिवशी हा कचरा शाळेत आणला जातो. 
शाळेमार्फत हे प्लॅस्टिक संबंधित संस्थेला पुनर्प्रक्रियेसाठी दिले जाते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news plastic free country school student sagar mitra organisation