#TuesdayMotivation : पितृछत्र हरपलेल्या सहा बहिणींना ‘मायभूमी’ची पाखर

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 18 February 2020

प्रत्येक दिवाळीला करतात मदत...
वडिलांच्या निधनानंतर सर्व मुलींना प्रा. विजय दरेकर यांनी संपूर्ण वर्षभरासाठी लागणारे शालेय साहित्य, बॅग, रोजच्या वापरासाठी नवीन कपडे, खेळाचे साहित्य आणि काही भेटवस्तू देऊन त्यांचे मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न केला. मुलींच्या आईने त्यांची फी भरण्यासाठी पैसे नसल्याचे सांगितल्यावर त्यांना लागणारी रक्कम रोख स्वरूपात मायभूमी विकास परिवारामार्फत त्यांच्या बॅंक खात्यावर जमा केली व लागेल तेव्हा मदत देण्याचे आश्वासन दिले. प्रत्येक दिवाळीला फराळ, मुलींना कपडे आणि गरजेच्या वस्तू घेऊन राजपूरला जातात.

घोडेगाव - वडिलांचे छत्र हरपले आणि आईसह त्या सहा जणींचा जगण्याचा संघर्ष सुरू झाला. त्यांच्या संघर्षाची दखल घेऊन एक भक्कम हात मदतीसाठी पुढे आला. त्यांनी सर्व मुलींच्या संगोपनाची व शिक्षणाची जबाबदारी घेतली. एवढेच नव्हे, तर थोरल्या मुलीचे कन्यादान करून लग्नसोहळा थाटात पार पाडला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

भीमाशंकर खोऱ्यातील अतिदुर्गम भागातील राजपूर (ता. आंबेगाव) येथील बबन लोहकरे यांचे अचानक उद्भवलेल्या आजारपणामुळे ७ ऑगस्ट २०१७ रोजी निधन झाले. त्यांच्या अकाली जाण्याने त्यांच्या सहा मुली आणि पत्नी यांचे छत्र हरपले. तिथूनच या माउलीच्या जीवनाच्या संघर्षाला सुरुवात झाली. त्यांची ही परिस्थिती ‘मायभूमी विकास परिवारा’चे संस्थापक अध्यक्ष प्रा. विजय दरेकर यांच्यापर्यंत पोचवली. सर्व माहितीची खातरजमा करून लगेचच मायभूमीच्या सर्व सहकाऱ्यांनी सर्व मुलींच्या शिक्षणाची व संगोपनाची संपूर्ण जबाबदारी घेण्याचे एकमताने ठरविले. त्यातील थोरली मुलगी दिव्याचे १४ फेब्रुवारी रोजी लग्न करण्यात आले. तिचे कन्यादान प्रा. दरेकर यांनी करून या कुटुंबाला शेवटपर्यंत साथ देण्याचा निर्धार कायम केला आहे.

पुण्यात सक्षम सार्वजनिक वाहतुकीची गरज

भोसरी येथील औद्योगिक प्राधिकरणात कार्यरत असणाऱ्या आसाणे येथील विशाल गभाले यांच्यासोबत हा विवाह पार पडला. यासाठी योगीराज नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर तापकीर, सुहास गदादे, अजित झेंडे, विद्याताई भास्कर, वंदना काळे, अमोल टिळेकर, प्रा. डॉ. मुकुंद तापकीर, संभाजी शिंदे, ए. एस. माने, प्रा. रवींद्र हांडे, गौरी दरेकर, शीतल भिसे, भारतीय विद्या भवन पुणे या शाळेतील सर्व क्‍लार्क या सर्वांनी योगदान दिले. लग्नानंतर जावईबापूकडून दिव्याचे शिक्षण पुढे चालू ठेवण्याचे वचन घेतले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marriage education life help Motivation