कोल्हापूर : मसाई पठार रस्त्यासाठी म्हाळुंगेकरांचे श्रमदान  

कोल्हापूर : मसाई पठार रस्त्यासाठी म्हाळुंगेकरांचे श्रमदान  

आपटी - पूरपरिस्थितीशी सामना करण्यात व्यस्त असलेल्या प्रशासनाची वाट न पाहता मसाई पठारावर जाणारा रस्ता म्हाळुंगे येथील ग्रामस्थांनी सलग तीन दिवस श्रमदान आणि लोकवर्गणीतून तयार केला. त्यामुळे पंधरा दिवस भूस्खलनामुळे जगाशी तुटलेला गावाचा संपर्क पूर्ववत करण्यात ग्रामस्थांना यश आले. 

पन्हाळा बांधारी परिसरात पडणाऱ्या मुसळधार पावसाने अनेकठिकाणी भूस्खलन झाले होते.भूस्खलनाचा जास्त फटका मसाई पठार परिसराला बसला होता. पठारावर जाणाऱ्या रस्त्यावर चहाची मळी परिसरात मोठ्या भेगा पडून रस्ता उताराच्या दिशेने घसरला होता. हा एकमेव रस्त्याच तुटल्याने पठारावरिल म्हाळुंगेचा जगाशी असलेला संपर्क तुटला होता. मसाई पठारावरील पर्यटनही बंद झाले होते. दळणवळण ठप्प झाल्याने ग्रामस्थांना आरोग्यसेवा, दुधपुरवठा,जीवनावश्‍यक वस्तूंसाठी तीन कि.मी.डोंगरातून पायपीट करावी लागत होती.

पूरपरिस्थितीमुळे प्रशासनावर पडणाऱ्या तणाची जाणीव ठेवून त्यांच्यावर अवलंबून न राहता ग्रामस्थांनी एकत्र येऊन जवळपास सहा फुट खोल खचलेला तीनशे मिटर लांब रस्ता श्रमदान व लोकवर्गणीतून करण्याचा निर्णय घेतला गावाने सलग तीन दिवस भरपावसातही श्रमदान करून रस्ता वाहतुकीसाठी पूर्ववत केला.

राधाकृष्ण तरूण मंडळाच्या कार्यकर्त्यांसह माजी आमदार डॉ. विनय कोरे, गोकुळ संचालक विश्‍वास जाधव, वनविभागाचे व्हर्टिकल ऍडव्हेंचर पार्क, श्री कृष्ण दुध संस्था तसेच ग्रामपंचायत जेऊर यांनी सहकार्य केले. 

भूस्खलनामुळे पूर्ण रस्ताच खचल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. पण प्रशासनाची वाट न पाहता आम्ही सर्व ग्रामस्थांनी श्रमदान आणि लोकवर्गणी तून रस्ता करण्याचा निर्णय घेऊन रस्ता पूर्ववत केला. 
- प्रियांका महाडिक,
सरपंच 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com