esakal | कोरोना संकटाला रोखण्यासाठी आता सामाजिक संघटनांचा पुढाकार
sakal

बोलून बातमी शोधा

Mini Ventilator

कोरोना काळात अनेक सामाजिक संस्थांनी जिल्हा प्रशासनाला मदतीचा हात दिला आहे.

कोरोना संकटाला रोखण्यासाठी आता सामाजिक संघटनांचा पुढाकार

sakal_logo
By
दिलीपकुमार चिंचकर

सातारा : कोरोनाच्या (Coronavirus) संकटाशी लढा देण्यासाठी जिल्ह्यातील अनेक सामाजिक संघटनांनी (Social Organization) पुढाकार घेतला आहे. कोरोनाशी सामना करताना आरोग्य यंत्रणेला (Health Department) मदतीचा हात देण्यासाठी स्वयंम संस्थेने जिल्हा परिषद प्रशासनास १० बायपॅप (मिनी व्हेंटिलेटर) Mini Ventilator मशिन दिल्‍या आहेत. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले (Uday Kabule), मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, उपाध्यक्ष प्रदीप विधाते, शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे, सदस्य भीमराव पाटील, दत्ता अनपट, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे, स्वयंम संस्थेचे मनोज विधाते, सचिन कांबळे, ग्रामपंचायत विभागातील संजय जाधव आदी उपस्थित होते. (Mini Ventilator Help From Social Organizations To The Health Department In Satara)

कोरोना आपत्तीचा सामना करत असताना ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणेने अधिक सक्षमपणे काम करण्यासाठी स्वयंम सामाजिक संस्था व स्वस्थ डिजिटल हेल्थ फाउंडेशन, ॲक्ट ग्रँट यांच्या सहकार्याने सातारा जिल्हा परिषदेला १० बायपॅप मशिन (मिनी व्हेंटिलेटर) देण्यात आल्‍या. याप्रसंगी कबुले म्हणाले, कोरोना काळात अनेक सामाजिक संस्थांनी जिल्हा प्रशासनाला मदतीचा हात दिला आहे.

हेही वाचा: तुम्ही १८ वर्षांपुढील आहात? जिल्ह्यातील ११ ठिकाणी लस मिळेल

या उपक्रमातून मिळालेल्या वस्तूंचा गरजू व्यक्तींना लाभ मिळणार आहे. शिवाय, हा व्हेंटिलेटर कोरोना रुग्णांची देखील मदत करणार असून शासनाच्या माध्यमातून देखील कोरोनाला रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहे. संस्थेचे सचिव सचिन कांबळे यांनी संस्थेच्या कोरोना काळातील उपक्रमाची माहिती देत संस्थेच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम सुरूच राहतील, असे त्यांनी सांगितले.

Mini Ventilator Help From Social Organizations To The Health Department In Satara

loading image
go to top