मुंबईचा डबेवाला बनला ‘कुरिअर बॉय’!

तिलक मेहता
तिलक मेहता

मुंबई - खेळण्या-बागडण्याच्या वयात स्वतःचा व्यवसाय सुरू करून तेरा वर्षांच्या तिलक मेहता याने मुंबईतील ३०० डबेवाल्यांना उद्योगाच्या मुख्य प्रवाहात आणले आहे. 

तिलकने सुरू केलेल्या ‘ॲप बेस्ड’ कुरिअर कंपनीत सध्या ३०० डबेवाले कुरिअर बॉय म्हणून काम करत आहेत. मोकळ्या वेळेत हाताला चांगले काम मिळाल्याने डबेवालेही खूष आहेत. घाटकोपर येथील गरोडिया आंतरराष्ट्रीय स्कूलमध्ये तिलक आठवीच्या वर्गात शिकतो. त्याने स्वतःची ‘पेपर एन पार्सल’ या नावाने कुरिअर कंपनी सुरू केली. एके  दिवशी तिलक नातेवाइकाकडे गेला होता. तिथे तो पुस्तक विसरला. ते पुस्तक दिवसभरात कसे आणता येईल, यासाठी त्याने खूप प्रयत्न केले. कुरिअर पोहोचविणाऱ्या कंपन्यांकडेही त्याने चौकशी केली; मात्र त्याला ती सेवा महागडी वाटली. तिथेच त्याला माफक दरात कुरिअर सेवा देणारी कंपनी उघडण्याची कल्पना सुचली.

उत्पन्न वाढविण्यासाठी काही डबेवाले रिक्षा चालवतात; तर काही माळीकाम करतात. तिलकने दिलेला कुरियरचा पर्याय उत्तम आहे. यामुळे डबेवाल्यांना चांगला मोबदला मिळण्यास मदत होते.
- सुभाष तळेकर, अध्यक्ष, मुंबई डबेवाला असोसिएशन

सगळे काही ॲपवर
सेवेसंबंधीचे सर्व नियम आणि सूचना त्याने ॲपवर आणि संकेतस्थळावर टाकून व्यवसायाला प्रारंभ केला. सुरुवातीचे काही दिवस तिलकने डबेवाल्यांसोबत लोकलमधून प्रवास करत त्यांच्या मार्गांचे सर्वेक्षण केले. त्यानंतर डबेवाल्यांना कुरियरच्या व्यवसायाबाबत प्रशिक्षण दिले. आज ३०० डबेवाले तिलकच्या कंपनीशी जोडले गेले आहेत. आठवड्याचे पाच दिवस शाळेचा अभ्यास पूर्ण करून तिलक सायंकाळी कंपनीच्या कामाचा आढावा घेतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com