सेंद्रिय शेतीच्या प्रयोगातून फुलविली फळबाग

सेंद्रिय शेतीच्या प्रयोगातून फुलविली फळबाग

सावनेर - केवळ दोन एकर शेतीत मोसंबी पिकाचे भरघोस उत्पादन घ्यायचे म्हटल्यावर कुणाचा विश्‍वास बसणार नाही. परंतु, हा यशस्वी प्रयोग नंदापूर येथील शेतकऱ्याने  पत्नी सुनंदाच्या मदतीने सेंद्रिय शेतीतून करून दाखविला. तसेच इतर शेतकऱ्यांपुढे आदर्श ठेवला.

तुळशीदास पाटील असे मोसंबीचे उत्पादन घेणाऱ्या प्रगतशील शेतकऱ्याचे नाव आहे. ते खासगी कंपनीत नोकरीवर आहेत. तरीही त्यांनी शेतीची नाळ तुटू दिली नाही. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती परवडत नाही म्हणूण बरेच शेतकरी शेतीपासून दूर जातात व दुसऱ्या व्यवसायाचा शोध घेतात. मात्र, पाटील यांनी शेतीला महत्त्व दिले. यासाठी त्यांना पत्नीची साथ मिळाली.

दोघांनीही जिथे कुठे शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण दिल्या जाते. अशा ठिकाणी उपस्थित राहून प्रशिक्षणाचा लाभ घेतला. त्यांच्याकडे असलेल्या चार एकरांपैकी दोन एकरांत मोसंबीची लागवड करून जोपासना केली. यासाठी कुंजलेले शेणखताचा वापर केला. शेतीतज्ज्ञांच्या मार्गदर्शनातून व्यवस्थापन केले. सुरुवातीला सिंचनाची अडचण बघून ठिंबक सिंचनाचा वापर केला. पत्नी सुनंदाने गृह उद्योग सांभाळून झाडांच्या संगोपनाकडे लक्ष दिले. याच कारणामुळे संत्रा व मोसंबी पिकांना फटके बसूनही पाटील यांची मोसंबी बाग फळांनी बहरलेली आहे.

होणार आर्थिक लाभ
उर्वरित दोन एकरांत सीताफळ व मोसंबी लागवड करण्याचा मानस आहे. शेतकरी बांधवांनी पारंपरिक शेतीतून फळ, भाज्या व पालेभाज्या शेतीकडे वळून शेतीतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार नियोजनबद्ध शेती करावी. यातून आर्थिक लाभ होईल, असे तुळशीदास पाटील म्हणाले.

लिंबू, संत्र्याची लागवड
परिसरातील साहेबराव पाटील, श्री. व्यवहारे, दिलीप खुबाळकर, अजाबराव रहाटे या प्रगतशील शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीची कास धरून लिंबू, मोसंबी व संत्रा पिकांच्या फळबागा फुलविल्या आहेत. सेंद्रिय शेतीमुळे जमिनीचा कस व उत्पादनाची पातळी कायम असून, बाजारपेठेत फळांची मागणी भरपूर असल्याचे हे शेतकरी सांगतात.

माल विक्रीला बाजार समितीत अडचणी आहेत. मालाला सुरक्षा नाही. शेतकरी निवासामध्ये व्यवस्था कोलमडलेली आहे. याकडे कळमना बाजार समिती व्यवस्थापनाने लक्ष देण्याची गरज आहे.
- तुळशीदास पाटील, प्रगतशील शेतकरी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com