तीनशे विद्यार्थिनींचा अवयवदानाचा संकल्प

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 सप्टेंबर 2017

नागपूर - देशात लाखो लोक अवयवदानाच्या प्रतीक्षेत आहेत. अशात आपण मृत शरीर जाळून किंवा जमिनीत पुरून मौल्यवान शरीर नष्ट करीत आहोत. मृत्यूनंतर नेत्र, त्वचा, मूत्रपिंड आदी अवयव गरजूंना दान करून सत्कारणी लावले, तर त्यापेक्षा महान पुण्य दुसरे कोणते नाही. आपण मरणोत्तर अवयवदान करण्याचे धाडस दाखविले, तर दुसऱ्याच्या जीवनात आनंद आणू शकतो. हेच लक्षात घेऊन २९९ विद्यार्थिनींनी डॉ. सुशील मेश्राम यांच्याकडे मरणोत्तर अवयवदानाची संकल्पपत्रे भरून दिलीत.

दुसऱ्याच्या जीवनात प्रकाश पेरण्यासाठी कालबाह्य रूढी परंपरांना बाजूला सारून मानवतेची मशाल मिरवण्याची गरज आहे, असे सेवादल महिला महाविद्यालयाचे मराठी विभागप्रमुख प्रा. डॉ. सुशील मेश्राम म्हणाले. ते महाविद्यालयातर्फे आयोजित जागतिक अंधश्रद्धा निर्मूलन दिन कार्यक्रमात बोलत होते. कार्यक्रमात अवयवदानाच्या समर्थनार्थ महाविद्यालयातील विद्यार्थिनी पुढे आल्या आणि राष्ट्रीय व मानवतावादी कार्यात सहभागी झाल्या. 

या प्रसंगी सुपसिद्ध पर्यावरणतज्ज्ञ व सेवादल महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण चरडे यांनी विद्यर्थिनींना प्रमाणपत्र देऊन राष्ट्रीय, विज्ञानवादी व मानवतावर्धित संकल्पाचे अभिनंदन केले. तसेच हा उपक्रम महाविद्यालयाद्वारे शैक्षणिक व सामाजिक स्तरावर राबवून अवयवदान चळवळीला गती देण्यात येईल, असा विश्‍वास व्यक्‍त केला.

Web Title: nagpur news student Organ donation