शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेतर्फे अंकाई-टंकाई किल्ल्यावर श्रमदान

शुक्रवार, 1 डिसेंबर 2017

नाशिक - नाशिक जिल्ह्यातील गडकोटांच्या संवर्धनासाठी सहा वर्षांपासून श्रमदान करणाऱ्या शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेने अंकाई-टंकाई किल्ल्यावर मोहीम राबविली. अध्यात्मिक, ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचा समजला जाणारा अंकाई-टंकाई किल्ला हा जोडकिल्ला मुघल मराठा साम्राज्याची ओळख आहे. मोठमोठी बुरुजे, तट, कोरलेले दरवाजे बघता हा जोडकिल्ला अत्यंत असुरक्षित अवस्थेत आहे.

किल्ल्यावरील टाक्‍यांत, तळ्यांत, कुंडात नैसर्गिक साबरे, झाडांना लटकलेले कपडे, देवस्थानासमोर भग्न वाड्यांच्या ठिकाणी अस्ताव्यस्त पडणाऱ्या असंख्य प्लास्टिक बाटल्या, कचरा मोठ्या प्रमाणात आहे. किल्ल्यावर अनेकांचा रोजची ये-जा सुरूच असते. किल्ल्यावरील सैनिकांच्या चौक्‍या, गुहा, बुरुजे, ऐतिहासिक वाडे, तटबंदीवर नको ते लिहून या वास्तू विकृत करण्याचा प्रकार मोठ्या प्रमाणात होत आहे. सध्या दुर्गसंवर्धन संस्थांकडून या किल्ल्याचे संवर्धन करण्यासाठी प्रयत्न होत असले, तरी किल्ल्याच्या ऐतिहासिक वाड्यांची पडझड व भग्न स्थितीत असल्याने त्यांचे संवर्धन व्हावे, याबाबत प्रशासन व स्थानिक गावाने किल्ल्याचे संवर्धन व संरक्षणाची यंत्रणा उभारणे अंकाई-टंकाई किल्ल्याच्या अस्तित्वासाठी नितांत गरजेचे आहे, असे मत किल्ले अंकाई-टंकाई संवर्धन मोहिमेत शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेच्या गडकोट संवर्धकानी घेतलेल्या बैठकीत व्यक्त करण्यात आले. या वेळी प्राचीन भग्न वाड्यांची श्रमदानातून स्वच्छता करण्यात आली. 

या वेळी शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेचे संस्थापक राम खुर्दळ, मानद सल्लागार डॉ. संदीप भानोसे, श्‍याम कुलथे, आर. आर. कुलकर्णी, योगेश अहिरे, गजानन दीपके, संतोष इटनारे, उपाध्यक्ष हर्शल पवार, मनोज अहिरे, गणेश सोनवणे, डॉ. भरत ब्राह्मणे, प्रीतम भामरे, पवन माळवे, संकेत नेवकर, गौरव भोईटे, सुदर्शन हिरे, योगेश्‍वर कोठावदे, अशोक कुंटरे, जयपालसिंग जामदार, सागर बोडके, अंजली प्रधान, संकेत भानोसे, निर्मिती शिंदे, कावेरी इटनारे, सुमेध इटनारे, स्वेताली घटमाळे, महंत गंगागिरी बाबा, ज्ञानगिरी बाबा, तनिष्का ब्राह्मणे, विशाल आवटे, सारंग शिंदे, आनंद खांडेकर, अपूर्व कुलकर्णी, मयांक खांडेकर, कुमारी अहिरे, प्रथमेश दीपके उपस्थित होते.