बासरीच्या स्वरांचा किमयागार हरीश

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 नोव्हेंबर 2017

पानटपरीधारक ते संगीत शिक्षक थक्क करणारा प्रेरणादायी प्रवास
नाशिक - बासरीच्या स्वरांचा किमयागार म्हणून पंचवटीतील हरीश उन्हवणे यांनी आपली ओळख तयार केली आहे. त्यांचा पानटपरीपासून सुरू झालेला प्रवास बासरीने संगीत शिक्षकापर्यंत पोचवला आहे. हा प्रवास इतरांसाठी निश्‍चित प्रेरणादायी असाच म्हणता येईल. 

पानटपरीधारक ते संगीत शिक्षक थक्क करणारा प्रेरणादायी प्रवास
नाशिक - बासरीच्या स्वरांचा किमयागार म्हणून पंचवटीतील हरीश उन्हवणे यांनी आपली ओळख तयार केली आहे. त्यांचा पानटपरीपासून सुरू झालेला प्रवास बासरीने संगीत शिक्षकापर्यंत पोचवला आहे. हा प्रवास इतरांसाठी निश्‍चित प्रेरणादायी असाच म्हणता येईल. 

पंचवटी महाविद्यालयात शिक्षण घेताना हरीशला रस्त्यावर बासरी विकणाऱ्याने आकर्षित केले. त्याच्या बासरीच्या स्वरांमध्ये तो तल्लीन झाला. त्याने दहा रुपयांत बासरी विकत घेतली. स्वरांचा अभ्यास नसल्याने गोदावरीच्या काठावर त्याच्या बासरीमधून बेसूर उमटू लागले. पण त्याने जिद्द सोडली नाही. एकेक स्वर शोधत त्याने बासरीवर सुंदर गाणी वाजविण्याची लय संपादन केली. घरची परिस्थिती बेताचीच असल्याने दिवसभर काम करून सायंकाळी बासरीवादन हा त्याचा नित्यक्रम झाला. महाविद्यालयीन जीवनात बासरीवादक म्हणून सहकाऱ्यांमध्ये ओळख तयार केली.                               

बी.ए.पर्यंत शिक्षण पूर्ण केल्यावर त्याने मुंबई- आग्रा महामार्गालगत पानटपरी सुरू केली. टपरीत त्याला कलावंत शांत बसू देत नव्हता. मग गिऱ्हाईक नसताना त्याने बासरीवादन सुरू ठेवले. एकेदिवशी रेयान इंटरनॅशनल स्कूलच्या एका शिक्षकाने हरीशचे स्वर ऐकले आणि त्याला थेट प्राचार्यांपुढे उभे केले. बासरीच्या स्वरांवरील पकड पाहून त्याला विद्यार्थ्यांना बासरीवादन शिकविण्याचे काम मिळाले. बासरीच्या जोडीला त्याने संगीताचे धडे स्वतः घेत विद्यार्थ्यांकडून गिरवून घेण्यास सुरवात केली. आता तो याच शाळेत संगीत शिक्षक आहे. हरीशला २५ प्रकारची वाद्ये वाजवता येतात.

त्यात बॅन्जो, माउथ ऑर्गन, हार्मोनियम, गिटार, मेंडोलिन, टिंगरी, झायलो फोन, सॅक्‍सोफोन आदींचा समावेश आहे. त्याने शास्त्रीय संगीताचे चार माध्यम पूर्ण केले. लंडन विद्यापीठाची तीन श्रेणीची परीक्षा तो उत्तीर्ण झाला आहे.

पक्षीनिरीक्षणातून गवसले स्वर
हरीशच्या घराच्या बाल्कनीबाहेर मोठा पिंपळ आहे. त्याच्या फांद्या घरात आल्या. पिंपळावरील पक्ष्यांचा किलबिलाट सकाळी ऐकावयास मिळतो. किलबिलाटाचे स्वर हरीशला आकर्षित करतात. बुलबुल, मैना, पोपट, रॉबिन, सनबर्ड, चष्मेवाला अशी अनेक पक्षी स्वरात गातात. हरीश आपली बासरी काढतो आणि धून पकडतो. त्या वेळी पक्षी स्तब्ध होतात. दरम्यान, माउथ ऑर्गन आणि गिटार ही वाद्ये हरीश एकाच वेळी वाजवतो.

Web Title: nashik news flute player harish unhavane