वडिलांच्या स्मरणार्थ दोन्ही मुले, सुनांचा देहदानाचा संकल्प

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 एप्रिल 2018

गंगापुरातील निरपळ कुटुंबाचा नवा पायंडा 
गंगापूर - वडिलांच्या निधनानंतर कुटुंबातील चार सदस्यांनी देहदानाचा संकल्प केला. गुरुवारी (ता. १२) ही प्रक्रिया पूर्ण झाली. येथील वारकरी संप्रदायाचे मच्छिंद्रनाथ निरपळ यांचे हृदयविकाराच्या झटक्‍याने नुकतेच निधन झाले.

गंगापुरातील निरपळ कुटुंबाचा नवा पायंडा 
गंगापूर - वडिलांच्या निधनानंतर कुटुंबातील चार सदस्यांनी देहदानाचा संकल्प केला. गुरुवारी (ता. १२) ही प्रक्रिया पूर्ण झाली. येथील वारकरी संप्रदायाचे मच्छिंद्रनाथ निरपळ यांचे हृदयविकाराच्या झटक्‍याने नुकतेच निधन झाले.

त्यांचा गुरुवारी (ता. १२) तेराव्याचा विधी झाला. या कार्यक्रमातच दोन्ही मुले, दोन्ही सुनांनी मरणोत्तर देहदानाचा संकल्प केला. मोठा मुलगा संतोष, पत्नी रंजना, लहान मुलगा जयेश, पत्नी मनीषा यांचा त्यात समावेश आहे. वडिलांच्या सामाजिक कार्याचा वारसा पुढे नेताना निरपळ कुटुंबाने सामाजिक भान राखत आपले वेगळेपण जपले आहे. विठ्ठलाचे निस्सिम भक्त असलेले मच्छिंद्रनाथ निरपळ हे धार्मिक, सामाजिक कार्यात अग्रेसर होते. याप्रसंगी औरंगाबाद युथ सोशल वेल्फेअर फाउंडेशनचे अध्यक्ष तथा मराठवाडा विभागीय अवयव प्रत्यारोपण समितीचे सदस्य राजेशसिंह सूर्यवंशी, डॉ. मंगेश मोरे, प्रा. दिलीप महालिंगे, जिजाबाई निरपळ, बापू शिरसाठ, प्रा. सुनील शिरसाठ, प्रा. जिरजीनाथ जाधव, अरुण वावरे, तुळशीराम दंडे, संदीप जाधव, संदेश महालिंगे, मारुती निरपळ, काकासाहेब निरपळ, तुकाराम निरपळ, जनार्दन निरपळ, विशाल गायकवाड, आबासाहेब सिरसाठ, योगेश धोत्रे, महावीर कटारिया उपस्थित होते. प्रा. महालिंगे म्हणाले, ‘‘ योग्य प्रमाणात अवयवदान होत नसल्याने आजही कित्येकजण अवयवांच्या प्रतीक्षेत आहेत.’’

Web Title: nirpal family body donate resolution motivation