माणुसकीच्या भिंतीमुळे गरिबांना लाभली ऊब

दीपक आहिरे - सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 डिसेंबर 2016

पिंपळगाव बसवंत - दारिद्य्रामुळे फाटकं आयुष्य, तशाच फाटक्‍या-तुटक्‍या कपड्यांनी जगणाऱ्या शहरातील गोरगरिबांसाठी थंडीत ऊब देणारी माणुसकीची भिंत ओझरमध्ये उभी राहिली आहे. ‘नको असेल ते देऊन जा, हवे असेल ते घेऊन जा’ अशा उपक्रमाच्या माध्यमातून समाजातील दानशूरांच्या मदतीने जुने कपडे गरजूंना देण्याचा उपक्रम ओझरमध्ये सुरू झाला आहे. वसंतदादा नागरी पतसंस्थेच्या माध्यमातून सुरू झालेल्या या भिंतीमुळे गरिबांना कडाक्‍याच्या थंडीत ऊब मिळत आहे.

आर्थिक संस्था म्हटली तर नफ्यासाठी चालणारी अन्‌ फार तर सभासदांसाठी मदतीचा हात देईल एवढ्यापुरतीच मर्यादित समजली जाते. पण, ओझरची वसंतदादा नागरी पतसंस्था याला अपवाद ठरली आहे. आर्थिक चौकट ओलांडत संस्थेने थंडीत कपड्यांअभावी कुडकुडणाऱ्यांसाठी समाजाच्या सहाय्याने मदतीचा हात पुढे केला आहे. घरातील नको असलेले कपडे ओझरच्या भगवा चौकात उभ्या राहिलेल्या माणुसकीच्या भिंतीजवळ जमा केले जात आहेत. 

समाजाच्या संवेदनांना साद घालणाऱ्या या उपक्रमाला नागरिक भरभरून प्रतिसाद देत आहेत. दिवाळीनिमित्त आलेले नवे कपडे, जुने कपडे या भिंतीजवळ संकलित होत आहेत.
थंडीत ओझरकरांचे हे दातृत्व कपड्यांविना तगमगणाऱ्या जिवांना मायेची ऊब देत आहे. दोन दिवसांपासून सुरू झालेल्या या उपक्रमात शेकडो गरजू हवे ते कपडे येथून घेऊन गेले. माणुसकीचे दर्शन घडविणाऱ्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. जनजागृतीतून झालेल्या कपडे संकलनामुळे गरिबांना थंडीत ऊब मिळत आहे.

Web Title: Old clothes in need of help in the community

टॅग्स