पनवेलमधील कुटुंबाचा अवयवदानाचा संकल्प

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 2 मे 2018

कळंबोली - अनेक वर्षांपासून पनवेल परिसरात विमा प्रतिनिधी म्हणून काम करणारे आणि रोटरी क्‍लबच्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात रमणारे सुरेश शेडगे यांनी लग्नाच्या २० व्या वाढदिवसाचे औचित्य साधून सहपरिवार मरणोत्तर अवयवदानाचा संकल्प केला आहे. ‘सकाळ’ने सुरू केलेल्या अवयवदान संकल्पनेतून प्रेरणा घेतल्याचे त्यांनी सांगितले.

सुरेश शेडगे यांच्यासह त्यांची पत्नी अलका, मुलगी कोमल आणि मुलगा सुदर्शन यांनी आपले इच्छापत्र एमजीएम हॉस्पिटलला दिले आहे. ‘सकाळ’ माध्यमाने अवयवदानासंबंधी सुरू केलेल्या प्रबोधनात्मक चळवळीपासूनच मी प्रेरित झालो होतो. तेव्हापासून अशा प्रकारच्या सामाजिक बांधिलकीचा विचार माझ्या मनात घोळत होता. त्यामुळे लग्नाच्या वाढदिवसाच्या पाच दिवस अगोदर त्याबद्दल कुटुंबातील सदस्यांची चर्चा केली. ते लगेच तयार झाले. प्रत्येक व्यक्तीने अवयवदानाचा संकल्प केल्यास अनेक जणांचा जीव वाचू शकतो, असे सुरेश शेडगे यांनी सांगितले.

सर्वांत श्रेष्ठ दान
मृत्यू हे चिरंतन सत्य आहे. जे कधीही बदलता येऊ शकत नाही. जगातून जाताना आपण समाजातील अनेक गरजूंच्या आयुष्यात आनंद फुलवून त्यांचे जीवन प्रकाशमय करू शकतो, याची जाणीव कमी जणांना आहे. शरीर क्षणभंगुर आहे. मृत्यूनंतर सारे नष्ट होते. मात्र अवयवरूपी जिवंत राहायचे असेल तर अवयवदान सर्वांत श्रेष्ठ पर्याय आहे, असे सुरेश शेडगे यांनी सांगितले.

Web Title: organ donate shedage family Resolution motivation