कचऱ्यातून आता सेंद्रिय खतनिर्मिती 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 19 एप्रिल 2017

जालना - शेतात निर्माण होणारा वाळलेला व हिरवा कचरा आणि शेणाच्या मदतीने शिवांश सेंद्रिय खताची निर्मिती करून, दुष्काळमुक्तीच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकण्याची किमया जनसाथी दुष्काळ निवारण मंचने केली आहे. या संस्थेच्या अंतर्गत ज्ञानज्योती ग्रामीण विकास मंडळ या संस्थेच्या वतीने येथील जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांच्या निवासस्थानी सेंद्रिय खताच्या निर्मितीची प्रात्यक्षिके घेण्यात येत आहेत. 

अठरा दिवसांमध्ये शेतीसाठी उपयुक्त सेंद्रिय खत तयार होईल. या खताच्या वापरानंतर उत्पादनात वाढ होणार आहे. जिल्हाभरातील दीडशेपेक्षा अधिक गावांत हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. ज्या शेतकऱ्यांकडे जनावरे आहेत, त्यांना यासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे. 

शेतात मोठ्या प्रमाणावर वाळलेला आणि हिरवा कचरा तयार होतो. अनेकदा शेतकरी हा कचरा जाळून टाकतो; त्यामुळे त्याचा काहीही उपयोग होत नाही; पंरतु या कचऱ्याचा सेंद्रिय खत तयार करण्यासाठी वापर करण्यासाठी ज्ञानज्योती ग्रामीण विकास मंडळ या संस्थेने पुढाकार घेतला आहे. जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांच्या निवासस्थानी वाळलेल्या आणि हिरव्या कचऱ्यापासून सेंद्रिय खत तयार करण्याची प्रात्यक्षिके घेण्यात आली. 

अशी केली जाते शिवांश सेंद्रिय खताची निर्मिती 
साडेचार फूट रुंद व चार फूट उंच लोखंडी जाळी तयार करून त्यामध्ये प्रारंभी वाळलेला कचरा आणि त्यानंतर हिरव्या कचऱ्याचे थर देऊन त्यावर शेणखताचा थर देण्यात येतो. चौथ्या दिवशी लोखंडी जाळी पडताळून बघण्यात येते. त्यानंतर जाळीच्या बाजूला सांडलेला कचरा पुन्हा त्या लोखंडी जाळीत टाकला जातो. त्यानंतर दिवसाआड सात दिवस जाळी पालटून टाकण्यात आल्यानंतर जाळीतील वाळलेला आणि हिरवा कचरा कुजून अठराव्या दिवशी शिवांश सेंद्रिय खत निर्मिती होते. हे खत उत्पादनवाढीसाठी उपयुक्त ठरेल, असा दावा केला जात आहे. 

तपासणीनंतरच निष्कर्ष - संतोष आळसे 
याबाबत कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) चे संचालक संतोष आळसे म्हणाले की, सध्या या बाबीकडे एक प्रयोग म्हणून पाहिले जावे. अठरा दिवसांनंतर खत तयार झाल्यानंतर त्यांची तपासणी केली जावी. त्यानंतर निर्माण झालेल्या खतामध्ये कोणते घटक किती प्रमाणात आहेत, ते स्पष्ट होऊ शकेल. त्यानंतरच याची उपयुक्तता ठरेल. 

Web Title: Organic fertilizer produced waste