कोकणात ‘पितांबरी'चा सेंद्रिय गूळ प्रकल्प 

कोकणात ‘पितांबरी'चा सेंद्रिय गूळ प्रकल्प 

ठाणे - कोकणात प्रथमच साकारलेल्या पितांबरी कंपनीच्या सेंद्रिय गूळनिर्मिती प्रकल्पाचे उद्‌घाटन नुकतेच राजापूरच्या तळवडे गावात कोकण भूमी प्रतिष्ठानचे संजय यादवराव यांच्या हस्ते झाले. 

पितांबरी प्रॉडक्‍ट्‌सचे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र प्रभूदेसाई, अरविंद नानिवडेकर, ऍग्रिकेअर विभागाचे सुहास प्रभूदेसाई, पितांबरीचे संचालक परीक्षित प्रभूदेसाई, ताम्हाणे हायस्कूलचे मुख्याध्यापक विजय पाटील, जिल्हा परिषद सदस्य आबा आडिवरेकर, शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते. 

पितांबरी कंपनीच्या वतीने कोकणातील शेतकऱ्यांना प्रोत्साहन देऊन सेंद्रिय गूळनिर्मिती प्रकल्पाची सुरुवात करण्यात आली आहे. ऊस लागवडीतून परिसरातील शेतकऱ्यांना रोजगार मिळाला आहे. या प्रकल्पामुळे कंपनीमध्ये ६० ते ७० कामगारांना रोजगार उपलब्ध होणार आहे. सुमारे दोन हजार टन उसाचे गाळप होणार असून, त्यासाठी २०० टन सेंद्रिय गुळाचे उत्पादन होणार आहे. या प्रकल्पामध्ये गूळ पावडर, गूळ ढेप, काकवी व इतर विविध पदार्थ बनवण्यात येणार आहेत. ८६,०३२ जातीच्या उसाची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांनी ८१०८८९०४२० या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 

फूड डिव्हिजनची दमदार वाटचाल
पितांबरी कंपनीतर्फे आठ वर्षांपूर्वी तळवडे व ताम्हाणेमध्ये कंपनीचे दोन युनिट सुरू करण्यात आले. दोन्ही युनिटमध्ये वेगवेगळ्या फुलझाडांची व औषधी वनस्पतींची लागवड करण्यात आली आहे. त्यानंतर कंपनीचा पुढील प्रवास सुरू असताना तळवडेमध्ये एप्रिल २०१५ मध्ये फूड डििव्हजनला सुरुवात झाली. त्यामध्ये सर्वप्रथम कंपनीने रुचियाना हळद पावडर व रुचियाना तिखट पावडर ही दोन उत्पादने बाजारात आणली. त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला असून, आता सेंद्रिय गूळही मोठ्या प्रमाणामध्ये बाजारामध्ये उपलब्ध होऊ शकणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com