पाडळशिंगी तलावात पहिल्याच पावसात साठा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 जून 2016

बीड : सोलापूर - धुळे राष्ट्रीय महामार्गावरील पाडळशिंगी (ता. गेवराई) गावातील मुख्य जलस्रोत असलेला तलाव "सकाळ रिलीफ फंडा‘तून मागील वर्षी गाळमुक्त झाला. यंदाही काम हाती घेतले आहे. दरम्यान, रविवारी रात्री झालेल्या पहिल्याच पावसामुळे तलाव अर्धा भरला आहे. या तलावात बऱ्हाणपूरहून (ता. गेवराई) येणाऱ्या तीन किलोमीटर अंतराच्या नदीचे "सकाळ रिलीफ फंडा‘तून खोलीकरण-रुंदीकरण केल्याने साठा वाढण्यास लाभ झाला आहे.
 
पाडळशिंगीची पाणीपुरवठा योजना, सिंचन सुविधा असलेल्या तलावात मोठ्या प्रमाणावर गाळ साचला होता. परिणामी तलावाची साठवण आणि झिरपण क्षमता कमी झाली होती. त्यामुळे जानेवारीअखेरीस हा तलाव कोरडा पडायचा. त्यामुळे तनिष्का गटाच्या मागणीनुसार मागील वर्षी "सकाळ रिलीफ फंडा‘तून तलावातील तब्बल 15 हजार ब्रास गाळ काढण्यात आला. तर यंदाही बऱ्हाणपूरहून पाडळशिंगी तलावात येणाऱ्या तीन किलोमीटर नदीचे खोलीकरण आणि रुंदीकरण सकाळ रिलीफ फंड, तनिष्का व्यासपीठ, साम टीव्हीच्या माध्यमातून करण्यात आले. यंदाही तलावातील गाळ काढण्यात आला. रविवारी रात्री या भागात जोरदार पाऊस झाल्याने तलावात मोठ्या प्रमाणात साठा झाला. गाळ काढल्यामुळे व खोलीकरण-रुंदीकरणामुळे म्हणजे, तलावाच्या खालच्या बाजूला असलेल्या विंधन विहिरींची (बोअर) पाणीपातळीही वाढल्याचे विकास चौधरी यांनी सांगितले. या दोन्ही कामांमुळे गावाचा पिण्याच्या पाण्याचा आणि सिंचनाचा प्रश्‍न सुटणार असल्याचे भीष्मा घोडके, मकरध्वज जगताप म्हणाले.

Web Title: Padalshindgi Dam firs Monsoon Rain full