प्रोजेक्‍टर वापरासाठी उपकरण

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 ऑक्टोबर 2017

पिंपरी - सध्याच्या डिजिटल युगात मोठमोठ्या कंपन्या, शाळा, महाविद्या-लयांमध्ये माहिती सादरीकरणासाठी प्रोजेक्‍टर वापरला जातो. परंतु बऱ्याच वेळा स्क्रू ढिले होणे, हवेमुळे किंवा अन्य कारणांमुळे हे सादरीकरण व्यवस्थित होत नाही. त्यासाठी ताथवडेतील राजर्षी शाहू अभियांत्रिकी महाविद्यालयातील अक्षय सुरेश म्हस्के या विद्यार्थ्याने एक उपकरण तयार केले आहे. ते मोबाईल ॲपद्वारे वापरू शकतो. यामध्ये कोणत्याही प्रोजेक्‍टरची दिशा बदलता येते. त्याच्या शोधाला पेटंटदेखील मिळाले आहे.  

अक्षय म्हस्के (मूळगाव अहमदनगर, सध्या रा. आकुर्डीतील हॉस्टेल) तंत्रज्ञान टेक्‍नॉलॉजीच्या द्वितीय वर्षात शिकत आहे. अनेक वेळा महाविद्यालयामध्ये लेक्‍चर चालू असताना प्रोजेक्‍टरचा वापर होत असे. परंतु त्याद्वारे व्यवस्थित प्रक्षेपण होत नसे. त्यातूनच अक्षयला कल्पना सुचली आणि त्याने हे उपकरण तयार केले. फोटोत दाखवल्याप्रमाणे त्याने उपकरण तयार केले आहे. ते ॲपद्वारे प्रोजेक्‍टरची सर्व ॲडजेस्टमेंट करते. माहिती तंत्रज्ञान विभाग प्रमुख डॉ. आर. बी. जोशी यांचे त्याला मार्गदर्शन लाभले.

असा होतो वापर
हे उपकरण मोबाईलमधील ब्लू टूथ किंवा वाय-फायला कनेक्‍ट केल्यानंतर ते ॲपद्वारे प्रोजेक्‍टरची सर्व ॲडजेस्टमेंट करते.
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pimpri pune news equipment for projector use