प्रीत शिरोडकरचा जागतिक विक्रम

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 डिसेंबर 2017

पिंपरी - अचाट बुद्धिमत्तेच्या बळावर पिंपळे सौदागर येथील प्रीत राजेश शिरोडकर या सहा वर्षांच्या चिमुकल्याने ‘पिरॉडिक टेबल’ पाठांतर स्पर्धेत ५६ सेकंदांत ११८ केमिकल इलिमेन्ट्‌स बिनचूक बोलण्याचे जागतिक विक्रम केला आहे. याबद्दल चॅलेंजर पब्लिक स्कूलमध्ये त्याचा नुकताच गौरव करण्यात आला. 

पिंपरी - अचाट बुद्धिमत्तेच्या बळावर पिंपळे सौदागर येथील प्रीत राजेश शिरोडकर या सहा वर्षांच्या चिमुकल्याने ‘पिरॉडिक टेबल’ पाठांतर स्पर्धेत ५६ सेकंदांत ११८ केमिकल इलिमेन्ट्‌स बिनचूक बोलण्याचे जागतिक विक्रम केला आहे. याबद्दल चॅलेंजर पब्लिक स्कूलमध्ये त्याचा नुकताच गौरव करण्यात आला. 

बुद्धिमत्तेवर आधारित ‘वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडिया’ या आंतरराष्ट्रीय संस्थेने १४ नोव्हेंबर २०१७ रोजी ‘पिरॉडिक टेबल’ पाठांतर स्पर्धा घेतली. त्यात प्रीतने यूकेतील एका साडेनऊ वर्षीय मुलीच्या नावावरील ६३ सेकंदांत उलट उच्चार करण्याचा विक्रम मोडला आहे. या संस्थेचे प्रतिनिधी राजेंद्र मिश्रा आणि गिरीश कुमार यांच्या निरीक्षणाखाली ही स्पर्धा झाली.

पिंपळे सौदागरमधील चॅलेंजर पब्लिक स्कूलमध्ये पहिल्या इयत्तेत प्रीत शिकत आहे. रसायनशास्त्र विषयात ‘पिरॉडिक टेबल’ असते. त्यामध्ये ११८ केमिकल इलिमेन्ट्‌स असतात. या इलिमेन्ट्‌सची प्रीतने सलग व उलटी गणती केली.

प्रीतचे वडील डॉ. राजेश शिरोडकर यांनी ‘मुलांची जडणघडण’ या विषयात डॉक्‍टरेट मिळविली आहे. आई प्रज्ञा शिरोडकर यांचे प्रोत्साहन त्याला मिळाले आहे. दहावीची अवघड गणितेही प्रीत सोडवितो. फोनिक्‍सद्वारे स्पेलिंग बनवितो. याबद्दल त्याने सर्टिफिकेट, मेडल आणि ट्रॉफीही मिळविली आहे.  
चॅलेंजर पब्लिक स्कूलमध्ये नुकताच प्रीतचा विशेष गौरव करण्यात आला.

संस्थेचे अध्यक्ष संदीप काटे, उपाध्यक्षा अनिता काटे, संचालक नीलेश काटे, वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ इंडियाचे अध्यक्ष पवन सोलंकी, मुख्याध्यापिका सुषमा उपाध्ये, ग्रामीण विभागाच्या अतिरिक्त पोलिस निरीक्षक तेजस्विनी सातपुते, क्वालिटी सर्कल फोरम ऑफ इंडियाच्या अध्यक्षा डॉ. रजनी इंदुलकर, डॉ. प्रा. ची. शेजवलकर उपस्थित होते.    

सोलंकी म्हणाले, ‘‘लहान वयात पाठांतर परीक्षेत यश मिळविणे ही दैवी देणगी आहे.’’

शेजवलकर म्हणाले, ‘‘प्रीतची एकाग्रता, स्मरणशक्ती अद्‌भुत आहे. हे दुर्मिळ आहे.’’

इंदुलकर म्हणाल्या, ‘‘प्रीतचे वडील गेली २० वर्षे आमच्याबरोबर ‘कॉर्पोरेट ट्रेनर’ म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे अचूक मार्गदर्शन आणि प्रीतची मेहनत आणि बुद्धिमत्ता याच्या बळावर हा विक्रम केला गेला आहे.’’ 

संस्थाध्यक्ष काटे व मुख्याध्यापिका उपाध्ये यांनीही मनोगत व्यक्त केले.

Web Title: pimpri pune news prit shirodkar world record