कबरीच्या पुनरुज्जीवनास धावला हिंदू तरुण!

शुक्रवार, 25 जानेवारी 2019

लोणी भापकर - जाती-धर्माच्या नावावर समाजात फूट पाडून आपले ईप्सित साधू पाहणाऱ्यांस मूळचा लोणी भापकरचा (ता. बारामती), पण सध्या जर्मनीत असलेल्या हिंदू तरुणाने सणसणीत चपराक लगावली आहे. मोडकळीस आलेल्या येथील पिराच्या कबरीच्या पुनरुज्जीवनासाठी चार लाख रुपयांची मदत दिली आहे. याशिवाय मित्रांच्या साहाय्याने आणखी मदत देण्याचे कबूल केले आहे.      दरम्यान, लोणी भापकर ग्रामस्थांनी कबरीच्या पुनरुज्जीवनाच्या कामास सुरवात केली आहे. गावात आजही हिंदू-मुस्लिम ऐक्‍य टिकून असल्याचे येथील ग्रामस्थांनी दाखवून दिले आहे. 

लोणी भापकर - जाती-धर्माच्या नावावर समाजात फूट पाडून आपले ईप्सित साधू पाहणाऱ्यांस मूळचा लोणी भापकरचा (ता. बारामती), पण सध्या जर्मनीत असलेल्या हिंदू तरुणाने सणसणीत चपराक लगावली आहे. मोडकळीस आलेल्या येथील पिराच्या कबरीच्या पुनरुज्जीवनासाठी चार लाख रुपयांची मदत दिली आहे. याशिवाय मित्रांच्या साहाय्याने आणखी मदत देण्याचे कबूल केले आहे.     

दरम्यान, लोणी भापकर ग्रामस्थांनी कबरीच्या पुनरुज्जीवनाच्या कामास सुरवात केली आहे. गावात आजही हिंदू-मुस्लिम ऐक्‍य टिकून असल्याचे येथील ग्रामस्थांनी दाखवून दिले आहे. 

लोणी भापकर येथे मुस्लिम समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या पीरसाहेबांची कबर आहे. सुमारे शंभर वर्षांपूर्वीच्या कबरीवर असणारा शेड मोडकळीस आलेला आहे, त्यामुळे तेथे धार्मिक विधी करण्यासाठी अडचण येत असे. हे ओळखून मूळचा लोणी भापकरचा पण, सध्या नोकरीनिमित्त जर्मनीत वास्तव्यास असलेल्या महेश चारुदत्त बारवकर या तरुणाने ४ लाख रुपयांची मदत दिली. त्या जोरावर ग्रामस्थांनी प्रत्यक्ष कामाला सुरवात केली आहे. इतर दानशूर मित्रांच्या मदतीने येथे आरसीसी बांधकाम काम पूर्ण करण्याचा निर्धार महेशने केला आहे. 

याबाबत मुस्लिम समाजातील ८७  वर्षीय महामुदभाई भिकनभाई तांबोळी म्हणाले, ‘‘हिंदू-मुस्लिम भेदभाव न मानता सर्वांनी एकत्रितपणे काम केले पाहिजे. महेशने ४ लाख रुपये देऊन पीरसाहेबांच्या कबरीचे काम सुरू केल्याने त्याचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहेत. लोणी भापकर गावात आज माझी तिसरी पिढी असून ती भजन, कीर्तनात पेटी-मृदंग वाजविण्याबरोबरच वीणा व टाळ घेऊन गायनाचे काम करते.  

कामाला सुरवात करताना खानसाब आत्तार, युनूस तांबोळी, आत्तार गुरुजी, विश्वास ढमाले, त्र्यंबक भापकर, दिलीप जगदाळे, नाना बारवकर, दिलीप सकाटे यांच्यासह महेश बारवकर, विजय बारवकर, सुदाम मदने, गोरख बारवकर, मुनीर तांबोळी, पिनू गायकवाड, गंगाराम मदने आदी उपस्थित होते.

वडील चारुदत्त व आई कविता बारवकर यांचे स्वप्न होते की मुलाने चांगले शिक्षण घेऊन मोठ्या पगारावर नोकरी करत समाजोपयोगी काम करावे. शिक्षणानंतर मी नोकरीसाठी जर्मनीला निघालो, त्या वेळी वडील म्हणाले होते की हा जर्मनीला चालला आहे खरे, पण तेथे हा टिकेल का? त्यांचे मित्र (स्व.) संपतभाई आत्तार यांच्या सूचनेवरून ते पिराला नवस बोलले होते. मला व माझ्या पत्नीलाही जर्मनीत चांगली नोकरी मिळाली. त्यामुळे हे समाजोपयोगी काम हाती घेतले आहे. 
- महेश बारवकर