सासवडची 'आरोग्यदायी' भली सकाळ 'सामाजिक'ताही जपतेय

श्रीकृष्ण नेवसे
शुक्रवार, 27 एप्रिल 2018

सासवड (ता.पुरंदर, जि.पुणे) : येथील अनेक तरुण व ज्येष्ठ मंडळींचे पहाटेपासून भल्या सकाळपर्यंत आरोग्यदायी फिरण्याचे ठिकाण म्हणजे वाघडोंगर, पालखीतळ व विविध मैदाने, सासवडभोवतीचे विविध जोडरस्ते. या विविध ठिकाणी गेल्यावर लोक विविध  सामाजिक काम करायला विसरत नाहीत. सध्या तर पशु पक्षांना अन्न पाणी देण्याचेही उपक्रम करीत आहेत.  

सासवड (ता.पुरंदर, जि.पुणे) : येथील अनेक तरुण व ज्येष्ठ मंडळींचे पहाटेपासून भल्या सकाळपर्यंत आरोग्यदायी फिरण्याचे ठिकाण म्हणजे वाघडोंगर, पालखीतळ व विविध मैदाने, सासवडभोवतीचे विविध जोडरस्ते. या विविध ठिकाणी गेल्यावर लोक विविध  सामाजिक काम करायला विसरत नाहीत. सध्या तर पशु पक्षांना अन्न पाणी देण्याचेही उपक्रम करीत आहेत.  

सासवडच्या वाघीरे महाविद्यालयाचा विद्यार्थी सुमेध वाघमारे हा नित्यपणे वाघडोंगर व लगतच्या टेकड्यांवर, महाविद्यालयालगतच्या झाडांवर मातीची भांडी पाण्याने भरुन ठेवतो. तसेच पक्षांना दानेही ठेवतो. मातीची आव्यात भाजलेली भांडी यासाठी की उष्णतेतही पाणी थंड राहावे व ते पक्षांना समाधानाने पिता यावे. हा सुमेध विविध पक्षांचे व प्राण्यांचे 30 ते 35 प्रकारचे आवाज काढतो. त्यामुळे आवाजाने त्यांना तो बोलावून घेऊन त्यांच्या दाणापाण्याजवळ त्यांना आणण्याचा प्रयत्न करतो.

वाघडोंगरावरच डाॅ. घनश्याम खांडेकर हे त्यांच्या सहकाऱयांसह विविध प्रकारच्या बिया आताच टोकत आहेत. पुढे पावसाळ्यात या बिया रुजतात. त्यांचा हा उपक्रम गेली अनेक वर्षे सुरु आहे. त्या जोडीला वाघडोंगर निसर्गयोग मंडळ झाडांची निगा राखण्यात व अनेकांना पहाटे व्यायामाला येण्याचा संदेश देण्यात आघाडीवर असते. 

100 मुलामुलींना संस्कारी लाभ
डाॅ. ऋता खांडेकर यांनी सहकारी महिलांसह डाॅ. खांडेकरांच्या मार्गदर्शनाखाली मुला मुलींचे आठवडाभराचे उन्हाळी शिबीर वाघडोंगर परिसरातच घेतले. त्यात त्यांनी सुर्यनमस्कार ते योगा - प्राणायम, टेकडी चढणे व विविध संस्कार मुलांना शिकवले. त्यात शंभर मुले मुली सहभागी झाली. तर दर शनिवारी डोंगरालगतच्या हनुमानाची पूजा करुन प्रसाद वाटप करीत धार्मिक वातावरणही प्रकाश शेडगे, राजेंद्र कोपर्डे आदींनी जपले आहे. तर विजय कोलते, शिवाजी घोगरे, गिरीश कर्नावट 

जखमी सभासदाला 76 हजाराचा आधार..
पालखीतळ योग मित्र मंडळ, पालखीतळ दे धक्का 45 ग्रुप यांनीही एकमेकांना मदत करणे, व्यायाम शिकवणे, सुट्टीच्या दिवशी एकदिवसीय अभ्यास सहल काढणे, सभासदांचे वाढदिवस उपक्रमांनी साजरा करणे.. असे उपक्रम राबविले. मध्यंतरी एक सभासद कल्याण सुराणा यांचा अपघात झाला होता. पालखीतळ दे धक्का 45 ग्रुपने शहाजी गायकवाड, शरद बोबडे, शहाजी निगडे, सुनिलकाका जगताप, संजय ग. जगताप, पिनुशेठ जगताप, पांडुरंग गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली 76 हजार रुपये जमा करुन त्यांचा रुग्णालय व अौषधोपचाराचा खर्च भागविला.

Web Title: Positive story of saving the environment in Saswad